यवतमाळ सामाजिक

सुसंस्कार विद्यामंदिर येथे सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

यवतमाळ: सुसंस्कार विद्या मंदिर येथे महान स्वातंत्र्य सेनानी, आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूँगा” या ब्रिदवाक्याने मनामनात ओळखल्या जाणार्‍या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कोरोना संक्रमणामुळे शाळेत विद्यार्थी प्रत्यक्षरीत्या येत नसल्याकारणाने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांद्वारे शाळेत हा कार्यक्रम साजरा झाला. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी शाळेचे सचिव श्री. के. संजय सर व प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. के. उषा मॅम यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून झाली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.के.संजय सर व प्रमुख पाहुण्या सौ. के. उषा उपस्थित होते
ह्या प्रसंगी सचिव के.संजय सर यांनी आपल्या भाषणाद्वारे सुभाषचंद्र बोस यांची शिस्त,शौर्य, धैर्य व उल्हास हे गुण विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी बाळगावे असे तसेच या
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोर वीरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली आणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारत भूमीचा एक तळपता सूर्य होता.
त्यांचे वकृत्व आणि विचार इतके प्रभावी होते की समोरचा आपसूकच त्यांच्याशी आणि पुढे स्वातंत्र्यलढ्याशी जोडला जाई.

नेताजींनी केलेलं कार्य आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारं, अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र उठवायला लावणारं असं आहे. म्हणूनच इंग्रजांनी देखील नेताजी सुभाषचंद्र बोस यांची धाहस्ती घेतली होती असे ते म्हणाले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे यांनी
तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा”
असा नारा देत भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवचैतन्य देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना हृदयापासून अभिवादन केले.

या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©