यवतमाळ राजकीय

सावळी सदोबा सर्कलमधील बहुतांश ग्रामपंचायतीवर प्रस्थापितांना नाकारत नवयुवकांना संधी

सावळी सदोबा:-आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा जि.प.सर्कल मधील बहुतांश ग्रामपंचायत निवडणूकीत प्रस्थापितांना नाकारत मतदारांनी यूवकांकडे ग्रामपंचायतीची एक हाती सत्ता सोपवली आहेत,सावळी सदोबा सर्कलमधील ईचोरा,दहेली,वरुड(भक्त)साखरा तांडा,सुभाष नगर,बारभाई,कवठा,आयता,
केळझरा(वरठी)वरुड (तुका) माळेगांव या 11 ग्रामपंचायतीच्या निवडणूक मतमोजणी कार्यक्रमाचा निकाल विस्मयकारक लागल्याचे चित्र दिसून आलेत,विशेष म्हणजे यापूर्वी ग्रामपंचायतीवर सत्ता गाजवलेल्या उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले,त्यामुळे नवोदित व तरुण उमेदवारांचा खांद्यावर मतदारांनी मोठी जबाबदारी दिल्याचे दिसून येत आहे,सावळी सदोबा सर्कल मधील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,आणि संपूर्ण सावळी सदोबा सर्कल मधील जनतेची लक्षकेंद्रित असलेली मौजा माळेगांव ग्रामपंचायत येथे 31 वर्षा नंतर या गावातील मतदारांनी एकता परिवर्तन विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व सातही उमेदवाराला निवडून देऊन ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता देण्यात आली,विजयी उमेदवारांमध्ये सौ.सरीता उमेश पवार,सौ.कोमल विलास कलापाक, सौ.वनिता ज्ञानेश्वर टेकाम,सौ.स्वाती केशव चौधरी,अविनाश रामराव डाखोरे,दिलीप दत्‍ता राठोड,गजानन काशिनाथ पानोडे

Copyright ©