यवतमाळ सामाजिक

जयंस्तभाच्या सौदर्यीकरणास सुरूवात*  *गुरुदेव युवा संघाच्या पाठपुराव्याला यश*

 

 

यवतमाळ :

शहरातील आझाद मैदानात स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणीतील जयस्तंभ असून, गेल्या अनेक वर्षापासून दुर्गधीचे साम्राज्य पसरले होते. गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोेज गेडाम यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याच्या पाठपुराव्याला यश आले असून, आजपासून सौदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात झाली.

शहरातील आझाद मैदानाचा वेगळा इतिहास असून, स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जयस्तंभाची स्थापना करण्यात आली. मात्र आझाद मैदानाला कच-याच्या ढिगा-यांनी वेढले असून, दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. गुरुदेव युवा संघाने नगरपरिषद मुख्याधिका-यांना निवेदन देवून सौदर्यीकरणाची मागणी केली होती. परंतू, नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. त्यानंतर गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी पाठपुरावा करून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. दरम्यान जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी जयस्तंभ परिसरात स्वच्छता करून सौदर्यीकरण करण्याचे आदेश नगर परिषद मुख्याधिका-यांना दिले आहे. अखेर गुरुदेव युवा संघाच्या मागणीला यश आले असून,जयस्तंभ परिसरातील स्वच्छता करण्यास सुरूवात झाली. जयस्तंभाची देखभाल करण्याची जबाबदारी गुरुदेव युवा संघाकडे द्यावी अशी मागणी केली आहे. २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांना कार्यक्रमाला बोलावण्यात येणार आहे.

Copyright ©