यवतमाळ राजकीय

*आचासंहिता भंग करणाऱ्या शिक्षकास, निलंबीत करण्याची मागणी*

 

 

 

महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शिक्षक मंचक देशमुख हे पुसद पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या बाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असून सुद्धा शासकीय सेवेत असताना नियमाचे भान न ठेवता त्यांनी आपल्या डोंगरगावातील ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता कार्यकाळात कायद्याचे उल्लंघन करून स्वतः बाहेर न पडता पडद्याआड राहून रात्रीला डोंगरगावातील नागरिकांना ग्रामपंचायत निवडणूक संबंधी बैठका घेऊन गावातील काही हस्तक हाताशी धरून ग्रामपंचायत पॅनल उभा करून उमेदवार उभे केले संबंधित शिक्षकाने आपल्या स्वतःच्या भ्रमणध्वनीवरून मतदाराशी संपर्क करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार महागाव यांच्या सह वरिष्ठ अधिकारी याना तक्रार करता प्रशांत देशमुख यांनी तक्रार केली आहे संबंधित शिक्षक यांनी आपलाच ग्रामपंचायत पॅनल आला सरपंच आपलाच होणार जवळच्या लोकांनी मतदान क्रॉसिंग केले बऱ्याच लोकांनी मला तुम्ही स्वतः उभे नाही असे म्हणून मी त्यांना एकदा माझ्या उमेदवारांना निवडून द्यावे लागते अशा संभाषणाची ऑडिओ क्लिप ची सीडी पुरावा म्हणून तक्रारदार यांनी अर्जासोबत दाखल केली आहे प्रशासकीय अधिकारी या बाबीची दखल घेऊन कार्यवाही करणार की संबंधित शिक्षकास पाठीशी घालणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधले आहे.

Copyright ©