Breaking News यवतमाळ सामाजिक

*चालत्या दुचाकीच्या डिक्कीतून ५० हजाराची चोरी* *बाजारपेठेत मुख्य रस्त्यावरील घटना* *पोलीसांत गुन्हा दाखल; आरोपी फरार*

 

———————————————————————

घाटंजी – पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर गजबजलेल्या ठिकाणी आमडी येथील शेतकरी बँकेतून पन्नास हजार रूपायाची रक्कम काढून दुचाकी स्पेंडर क्र एम एच २९ एल ५९९४ ने शिवाजी चौकाकडे जात असताना दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान अग्रसेन चौकात एक दुचाकी समोर आल्याने दुचाकीचा वेग कमी करताच अज्ञात चोरट्याने पन्नास हजार रुपये चोरी केल्याची घटना घडली.

विस्तृत वृत्त असे की यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यातून खाजगी कामासाठी पैसे काढले व घरी जात असतानाच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी अग्रसेन चौकात अज्ञात चोरट्यांनी शंभर रूपयाच्या नोटाचे पाच बंडल असे एकुण पन्नास हजार रुपये रोख रक्कम दुचाकीच्या डिक्कीतून चालू गाडीत गाडीचा पाठलाग करीत चोरी केल्याची घटना घडली. हि बाब लक्षात येताच आरडाओरडा केला परंतु चोरटा रक्कम घेऊन पसार झाला.

या घटनेची फिर्याद घाटंजी पोलीसांत फिर्यादी अनील त्र्यंबक ठाकरे वय ४५ रा आमडी यांनी नोंदवली.यावरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद केला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुखदेव चव्हाण करत आहे.

भरदिवसा गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर चालत्या दुचाकीच्या डिक्कीतून पन्नास हजार रुपयांची झालेल्या चोरीची घटना एका सिसिटिव्हीच्या फुटेजमध्ये कैद झाली. या चोरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल सुध्दा झाले यामुळे शहरात भरदिवसा चोरी होणे म्हणजे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर जनता प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. या चोरट्यांला जेरबंद करण्याचे आवाहन पोलीसापुढे उभे ठाकले आहे.

Copyright ©