यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा येथे पि.एल‌ शिरसाठ स्मृतीदिन साजरा

“”””””””””””””””””‘””””””””””””””””””””””””””””
सावळी सदोबा:-आर्णि तालुक्यात येत असलेल्या सावळी सदोबा येथे आज दिनांक 21/1/2021ला ग्रामीण पत्रकार संघटना सावळी सदोबा यांच्यावतीने ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व झुंजार नेते स्व.पी.एल.शिरसाठ यांच्या पावन स्मृतिदिनी साहेबांना विनम्र अभिवादन करून,या स्मृतिदिन कार्यक्रमात ग्रामीण पत्रकार संघटनेचे शिल्पकार पि.एल शिरसाठ यांच्या प्रतिमेचे पत्रकार बांधवांनी पूजन करून पि.एल शिरसाठ यांच्या जिवनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले,आज पत्रकारावर अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून हल्ले होत आहेत, त्यामुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत, त्यामुळे पत्रकार संघटना कशी मजबूत करता येईल हे पत्रकारांनी प्रथम पहिली पाहिजेत कोणत्याही गोष्टीला न घाबरता समाज हितासाठी निर्भीडपणे लिखाण करावे व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे हेच पत्रकाराचे खरे दायित्व असेल,या जयंती कार्यक्रमाला खालील पत्रकार बांधव उपस्थित होत, आसिफ पठाण,रुपेश भाऊ खरतडे, प्रमोद भाऊ कोटावर, दुर्गेश भाऊ करनेवार,अमिन चव्हाण,राम पवार, योगेश बुटले,

Copyright ©