यवतमाळ राजकीय

शिरपूर ग्रामपंचायतीवर मनसे चा झेंडा

 

आर्णी/ नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या ग्रामपंचायतीमध्ये नवीन उमेदवारांना संधी प्राप्त झाली आहे असेच एक गाव तालुक्यातील शिरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत आघाडीने बाजी मारली आहे या ग्रामपंचायतीची संपूर्ण तालुक्यात एकच चर्चा तालुक्याचे तालुका अध्यक्ष सचिन गंधेवार यांच्या मार्गदर्शनात निवडणूक पार पडली शिरपूर येथे मनसे कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून ही ग्रामपंचायत पदरात पाडून घेतले यामध्ये मोलाचे कार्य करणारे शिरपुर येथील मनसे तालुका संघटक सुरज राठोड यांनी उत्कृष्ट कामगिरी करून तालुक्यांमध्ये एकमेव मनसे ग्रामपंचायत निवडून आणण्यात यश प्राप्त केले आहे शिरपूर ग्रामपंचायत मधून सात उमेदवारांपैकी सहा उमेदवार मनसे अधिकृत पॅनलच्या निवडून आले आहे
मणसे तालुका अध्यक्ष सचिन येतगंधेवार यांच्या मते आर्णी नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये मनसे आपला झेंडा नगरपरिषदेवर रोवल्याशिवाय राहणार नाही
असे मत व्यक्त केले

Copyright ©