यवतमाळ राजकीय

*केळापुर तालुक्यात सर्वच पक्षांना समिश्र यश* 

 

 

यवतमाळ/पांढरकवडा /करंजी –

तालुक्यातील ४० गावांची मतमोजणीत शिवसेना,कोग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांना संमिश्र यश पाप्त झाले असुन भाजपने अनेक ठिकाणी आपली खाती उघडली आहे.

सर्वाधिक चर्चेत असलेल्या पाटणबोरी येथे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंकीवार यांचे भाऊ पराभूत झाले असुन या ठिकाणी कॉंग्रेस ला ८ शिवसेना ५ आणि भाजप आणि सजग मंच ला ४ ठिकाणी विजय प्राप्त झाला तर पहापळ येथे पारवेकर व भाजप गटाचा ९ ठिकाणी आणि महाविकास आघाडीस फक्त ४ ठिकाणी विजय प्राप्त झाला.

तालुका प्रमुख तिरुपती कंदकुरिवार यांच्या नेतृत्वाखाली सायखेडा, सुन्ना ,लिंगती,वाठोडा, येथे शिवसेनेला मोठे यश प्राप्त झाले उमरी रोड आणि तेलंग टाकली येथे भाजप समार्थित पॅनल ला बहुमत प्राप्त झाले आहे. तर कोंघारा येथे जितेंद्र सिंह कोंघारेकर यांच्या पॅनल ला सर्वच्या सर्व सातही जागेवर विजय प्राप्त झाला,वांजरी येथे पंचायत समितीचे सदस्य संतोष बोडेवार यांच्या ग्रामविकास पॅनल ले चक्क चौथी वेळ ग्राम पंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात यश प्राप्त केले. सायखेडा येथे शिवसेने मोठे यश प्राप्त झाले.

राज्यपाल यांचे दत्तक ग्राम मांगुरडा येथे माजी जिप सदस्य राकेश नेमणवार यांच्या पॅनला बहुमत प्राप्त झाले. पिंपरी,सोंनबर्डी,चनाखा,रूढा येथे माजी आमदार राजू तोडसाम समार्थित पॅनल चा विजय झाला. वारा येथे मनसेला मोठे यश प्राप्त झाले इलियास पठाण व निमिष मानकर (जि. प. सदस्य) यांच्या नेतृत्वात रुंझां येथे मोठे यश मिळाले अनेक ठिकाणी नवयुवक विजयी झाले असुन या वेळी सर्वि कडे तिरंगी लढत झाल्याने सर्वांचे लक्षं या मतमोजणी कडे लागले होते.

Copyright ©