Breaking News यवतमाळ राजकीय

*मतदार यादीत घोळ, अनेक मतदार मतदानापासून वंचित, दहा वर्षापूर्वी मयत झालेल्यांची नावे आजही यादीत*

 

 

मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याने मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली, दहा ते बारावर्षापूर्वीची मयत झालेली नावे आजही कायम आहे तर जे मतदार सतत आजपर्यंत मतदान करीत आले असे विस ते पंचवीस मतदाराची नावे मतदार यादीत आलेच नाही तर जे मतदार गावातील रहिवासी नाही असे पंचवीस, तीस मतदारांचा यात समावेश करण्यात आला जे मतदार हयात आहे अशा मतदारांना मतदान यादीत घेण्यातच आले नाही अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले आहे तर नवीन मतदारांच्या नावाचा या यादीत समावेश करण्यात आला नाही तर अनेकांचे मतदान ओळख पत्र आले नसल्याने आधार कार्डचा वापर करावा लागत आहे विशेष म्हणजे गावातील अनेक रहिवासी असलेल्या मतदाराचे नाव नसल्याने त्यांनी निवडून येणाऱ्या उमेदवारास पराभव स्वीकारावा लागणार निवडणुक अधिकारी यांचे या कडे तिळमात्रही लक्ष नसल्याने सबंधित कर्मचारी मतदार याद्या जशाच्या तशाच देत असल्याने पुनः पुन्हा तीच नावे येत आहे अशा प्रकाच्या चुका अधिकारी वर्गाकडून केल्या जाते आणि याचा दुष्परिणाम ग्रामीण जनतेला भोगावा लागतो याची जिल्हा अधिकारी यांनी दखल घेऊन संबदितास समज द्यावी अशी मागणी केल्या जात आहे!

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©