यवतमाळ सामाजिक

*यात्रेवर बंदी का?*

 

तालुक्यात पांढरदेवी नवरगाव आणि गाेटमार बाेरी येथे धार्मिक कार्यक्रमा साेबतच यात्रेचे आयोजन करण्या येते परंतु यावर्षी काेराेनामुळे यात्रा भरेल की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे यात्रा न भरल्यास अनेकांना रोजगार मिळणार नाही मागील एक वर्षापासून अनेकांचे संसार उघड्यावर आले तर यात्रा भरवल्यास शेकडो व्यावसायिक आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी चार पैसे कमविण्याची हि एक संधी असते या वरच सरकारने का म्हणुन प्रतिबंध लावावा असे सर्वसामान्य व्यावसायिक आणि भाविकांनी मात्र यात्रा का नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे लाखो लाेकांचे पांढरदेवी जळका तुळजा माता नवरगाव आणि गदाजी महाराज बाेरी हे श्रध्दास्थान असल्याने हजारो भाविक या ठिकाणी नतमस्तक होण्याकरिता परप्रांता मधुन येतात अनेक भाविंकाचा या यात्रेत भावपूर्ण सहभाग दिसुन येतो परतुं या वेळी सर्व धार्मिक स्थळे काेराेनामुळे बंद आहेत, आणि या परिसरातील तीनही यात्रा रद्द हाेणार असल्याचे बोलल्या जात आहे परिणामी भाविकांत नाराजी सुर उमटत असल्याने तात्काळ यात्रेला परवानगी देण्यात यावी कारण ज्या ज्या ठिकाणी गर्दी होते तिथे परवानगी दिली उदा. प्रशासनानी निवडणुका सुरू केल्या , अनेक मोठ मोठे मंदिर सुरू केले परंतु लहान मंदिरांना का मज्जाव केल्या जात आहे अशा मोठ्या मंदिराच्या ठिकाणी गर्दी उसळत आहे मग तालुकास्तरावरच्या यात्रा रद्द करणे कितपत योग्य आहे असा सवाल ग्रामीण परिसरात चर्चिल्या जात आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©