Breaking News यवतमाळ सामाजिक

*कळंब- राळेगांव रोडवरील आमला येथे भिषण अपघात एक ठार तर एक गंभीर जखमी*

 

 

*अज्ञान वाहनाने उभ्या असलेल्या मोटारसायकल ला जबर धडक देऊन वाहन झाले पसार*

 

*कळंब* कळंब राळेगाव रोडवरील आमला येथे काल रात्री 10 च्या सुमारास झालेल्या भिषण अपघातात एक जागीच ठार तर अतिशय गंभीर जखमी झाला आहे अपघातात मरणपावल्या ईसमाचे नांव नंदु मनोहर राऊत वय वर्षै 45 तर गंभीर जखमी झालेल्या ईसमाचे नांव शैलेश नंदा गवळी वय वर्षे 26 असे आहे दोन्ही ईसम राहनार तिरझडा येथील आहे कळंब येथील आपले काम आटोपून आपल्या घरी जात असंताना आमला गावातील बसटाँपवर थंडी मुळे थांबले असताना काळाने त्याच्यावर झडप घातली कळंब वरून येत असलेल्या अज्ञान वाहनाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या दोन्ही ईसमाला जबर धडक दिली त्यात एक जागीच ठार तर गंभीर जखमी झाला आहे जखमींना शासकीय रुग्णालयात हलविण्यातआलेआहे घटनास्थळी तत्काळ गावकऱ्यांनी धाव घेतली

व मोलाचे सहकार्य केले घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली काही काळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते पुढील तपास कळंब पोलिस करित आहे

Copyright ©