महाराष्ट्र राजकीय

*महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात ‘महाविकासआघाडी’साठी प्रयत्न, पण…*

 

 

मुंबई प्रतिनिधी – दिनेश भोजने

07039352497

 

मुंबई प्रतिनिधी – कोलकाता, 14 जानेवारी :

महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडी करत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. असाच काहीसा प्रयोग तृणमूल काँग्रेस ने करण्याचा प्रयत्न केला. तृणमूल काँग्रेसने भाजपविरोधात डावे आणि काँग्रेसने ममता बॅनर्जी यांना साथ द्यावी, असं आवाहन केलं होतं. पण या दोन्ही पक्षांनी या आवाहनला केराची टोपली दाखवली आहे. भाजपविरुद्ध लढायचं असेल, तर आघाडी करण्यापेक्षा तृणमूल काँग्रेसला काँग्रेसमध्ये विलिन करावं, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

 

दुसरीकडे भाजपने तृणमूल काँग्रेसच्या या आवाहनावर निशाणा साधला आहे. तृणमूलचं हे आव्हान म्हणजे विधानसभा निवडणुकीत ते भाजपचा मुकाबला करू शकत नाहीत, याची कबुली असल्याची टीका भाजपने केली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय म्हणाले, ‘जर डावे आणि काँग्रेस खरंच भाजपच्या विरोधात आहेत, त त्यांनी सांप्रदायिक राजकारणाविरोधात लढाई लढणाऱ्या ममता बॅनर्जींची साथ द्यावी. ममता बॅनर्जीच भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष राजकारणाच्या चेहरा आहेत.’

 

पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी भाजपला बंगालमध्ये मजबूत होण्यासाठी तृणमूल काँग्रेसच जबाबदार आहे, असा आरोप केला. ‘आम्हाला तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करण्यात काडीचाही रस नाही. जर ममता बॅनर्जींना भाजपविरोधात लढाई लढण्याची इच्छा असेल, तर त्यांनी काँग्रेसमध्ये यावं, कारण सांप्रदायिकतेविरोधातल्या लढाईचा हा एकमेव मंच आहे,’ असं अधिर रंजन चौधरी म्हणाले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©