यवतमाळ सामाजिक

*जिजाऊ जयंती दिनी अभ्यासिकेचे लोकार्पण*

 

 

( रमाई महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम )

आर्णी ( प्रतिनिधी ): आर्णी येथील रमाई महिला मंडळच्या वतीने फुले-शाहू-आंबेडकर स्टडी सर्कलची स्थापना उरुवेला बौद्ध विहार वैभव नगर आर्णी येथे करण्यात आली असून काल जिजाऊ, सावित्रीमाई व फातिमा शेख यांची संयुक्तिक जयंती साजरी करून मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

 

वाढती बेरोजगारी व तरुणांचे वाचनाकडे होत चाललेले दुर्लक्ष पाहून आर्णी शहरातील रमाई महिला मंडळाने तरुण पिढीला वाचनाकडे वळविण्यासाठी व त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्याचा संकल्प सावित्रीमाई यांच्या जयंतीच्या दिवशी केला होता. आपल्या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी सतत आठ दिवस अनेक समस्यांना तोंड देत वैभव नगर येथील उरुवेला बौद्ध विहारात ‘फुले-शाहू-आंबेडकर स्टडी सर्कल’ ची स्थापना केली. तसेच जिजाऊ, सावित्रीमाई व फातिमा शेख यांच्या संयुक्तिक जयंतीच्या निमित्याने काल दिनांक 12 जानेवारीला अभ्यासिकेचे लोकार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले. या लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष माजी आमदार ख्वाजा बेग, उदघाटक आर्णी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना मंगाम तर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक राजुदास जाधव, माजी प्रथम नगराध्यक्ष अनिल आडे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा सुनंदा बोक्से, संगीता रावते, नीता ठाकरे, प्रीती आखरे, वनमाला भालेराव, आर्णी प्रेस क्लबचे नौशाद अली, विनोद सोयाम, मराठा सेवा संघाचे संदीप बुटले, विवेक ठाकरे व किशोर इंगोले आवर्जून उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे संचालन नितु तेलगोटे-वानखडे, प्रास्ताविक शालिनी भगत तर आभार दीपाली देशमुख-हिरोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुष्पजया रवी देवस्थळे, धम्मज्योती दिलीप मनवर,पूनम मंगेश पाटील, किरण प्रकाश भगत, सुनीता भीमराव भवरे, रेखा नालंदा भरणे, अनुराधा सुनील सुखदेवे, मीना दादाराव खरतडे, सीमा देवकांत वंजारे, अलका गौतम वाकोडे, गंगा उत्तम मोरे, लीला तुकाराम हिरोळे, विमल हरिदास बन्सोड, कांताबाई वंजारे, वैशाली सरपे,किरण दीपक हिरोळे, रोशनी निलेश बन्सोड, आम्रपाली किरण पाटील, कांताबाई स्थूल, शिला गायकवाड, मीना भरणे, मीना भगत, उज्वला देवतळे,संगीता राठोड, वर्षा रुडे, बबिता राठोड, विद्या मुजमुले, संध्या दैवल्य इत्यादी महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच, सत्यशोधक बहुउद्देशीय संस्था, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड, आर्णी प्रेस क्लब च्या सदस्यांनी त्यांना विशेष सहकार्य केले.

_____________________________

*लोकसहभागाची गरज- राजुदास जाधव*

 

रमाई महिला मंडळाने लावलेल्या फुले-शाहू-आंबेडकर स्टडी सर्कलच्या रोपट्याचा वटवृक्ष करण्यासाठी लोकसहभागाची नितांत गरज असल्याचे मत राजुदास जाधव यांनी व्यक्त केले. त्याकरिता त्यांनी 11 हजार रोख रक्कम, नानभाऊ बंगळे यांनी दरवर्षी 5 हजार रुपये, अभियंता दीपक हिरोळे यांनी अभ्यासिकेसाठी स्वच्छता गृह व पाण्याची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष नालंदा भरणे यांनी विहाराची जागा उपलब्ध करून महिलांना प्रोत्साहित केले.

Copyright ©