यवतमाळ सामाजिक

तब्बल बारा दिवसापासुन गायब असलेल्या तरुणीचा लावला शोध

 

 

दिग्रस पोलिसांचा गावकऱ्यांनी केला सन्मान

 

दिग्रस

 

 

तालुक्यातील ग्रामीण भागात चिरकुटा गावातील शिकत असलेली एक मुलगी घरातील आई-वडिलांसोबत किरकोळ भांडणाच्या कारणावरून घर सोडून निघून गेली होती संबंधित मुलीच्या आईवडिलांनी नातेवाईक मित्र मैत्रीण इतर ठिकाणी विचारपूस करून काही शोध लागत नसल्यामुळे शेवटी अखेर दिग्रस पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दिली त्या अनुषंगाने तपास सुरू झाला आणि दिग्रस चे ठाणेदार सोनाजी आम्ले यांनी त्या मुलीच्या संपर्कात आलेल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या घरी पोलीस कर्मचारी पाठवून सखोल चौकशी सुरू केली वेगवेगळ्या विभागात पोलिसांच्या तुकड्या निर्माण करून कसून तपास सुरू करण्यात आला सोबतच दिग्रसला नव्याने रुजू झालेले सायबर क्राईमचे अभ्यासक धिरेंद्रसिंग बिलवाल यांनी आपल्या सायबर क्राईमच्या क्षेत्रातील अनुभवाचा उत्कृष्ट पद्धतीने वापर करून त्या मुलीचा नंबर ट्रेस करून त्या मुलीच्या मोबाईल नंबर वर आलेल्या आणि गेलेल्या कॉल, एसएमएस याचा शोध घेत अवघ्या बारा दिवसात कसून तपासणी करत शेवटी त्या मुलीचा शोध लावला वेगवेगळ्या ठिकाणातील जवळपास एकूण 70 कॉल आणि एसएमएस यांचा अतिसूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून मुलीचा शोध घेतला आणि त्या संबंधित ठिकाणी नातेवाईकास पाठवून मुलीला ताब्यात देण्यात आले विशेष म्हणजे या मुलीचा काही क्रूर बुद्धीच्या लोकांनी कटकारस्थान रचून गैरफायदा तर घेतला नसावा किंवा काही अनुचित प्रकार घडला नसावा या काळजीने संपूर्ण नातेवाईक ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले होते परंतु अगदी सुखरूप रित्या या मुलीला घरी परत आणण्यात दिग्रस पोलिसांना यश मिळाले असल्यामुळे दिग्रस चे ठाणेदार सोनाजी आम्ले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरेंद्रसिंग बिलवाल यांचे त्या गावातील ग्रामस्थांनी मुलीच्या नातेवाईकांनी आनंदात भारावून जाऊन अगदी कमी वेळेत मुलीचा शोध घेतल्याबद्दल पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांचा सत्कार केला

—————–//———–

यावेळी ठाणेदार सोनाजी आम्ले यांना विचारले असता उपविभागीय पोलिस अधीक्षक उदयशिंग चंदेल यांच्या मार्गदर्शनात आम्ही ही कारवाई पार पाडली असून धिरेंद्रसिंग बिलवाल यांचे सुद्धा यावेळी ठाणेदार सोनाजी आम्ले यांनी कौतुक केले

Copyright ©