Breaking News यवतमाळ सामाजिक

*ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश*

 

 

यवतमाळ, दि. 12 :

जिल्ह्यातील एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदान व 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.

 

सदर निवडणूक शांततेत पार पाडण्याकरीता महाराष्ट्र देशी दारू नियम 1973 चे नियम 26(1)(सी) व महाराष्ट्र विदेशी मद्य नियम (सेल ॲन्ड कॅश) नियम 1969 चे नियम 9 A(2)(C)(2) मधील तरतुदीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आहे त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मद्य विक्री अनुज्ञप्त्या (एफएल -1, एफएल-2, सीएल/एफएल/टिओडी-3, एफएल/ बिआर-2 एफएल -3, सिएल-2, अनुज्ञप्ती ) खालीलप्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

 

मतदान अगोदरचा दिवस दिनांक 14 जानेवारी, मतदानाचा दिवस 15 जानेवारी, मतमोजणीचा दिवस 18 जानेवारी 2021 ला यवतमाळ जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक आहे त्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील अनुज्ञप्ती बंद पूर्ण दिवस राहील. तसेच दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी ज्या तालुक्याचे ठिकाणी मतमोजणी आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थाची हद्दीतील अनुज्ञप्ती मतमोजणीचा निकाल लागेपर्यंत बंद राहील.

 

बंदच्या कालावधीत अनुज्ञप्ती मद्य विक्रीसाठी उघडी ठेवू नये. तसे आढळून आल्यास संबंधीत अनुज्ञप्ती व अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी कळविले आहे.

Copyright ©