यवतमाळ सामाजिक

*जवळा ( खांड) येथे पंच अवतार उपहार, पंच कृष्ण पुजन व सन्यास दीक्षा विधी संपन्न*

 

महानुभाव श्री दत्तात्रेय प्रभु मंदिर जवळा ( खांड) येथे पंच अवतार उपहार, पंच कृष्ण पुजन व सन्यास दीक्षा विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विविध धार्मिक कार्यक्रमात हिवरी येथील प्रतिष्ठित

दत्तुजी चेके यांना दीक्षा देण्यातआली यावेळी त्यांचे नामकरण करून दामोधरदादा पंजाबी असे नाव दिले या पुढे याच नावानी ते आपले व्रत जोपासत राहणार आहे या कार्यक्रमास

प पु दिंगाबरबाबा अंकुळनेरकर, प पू वैद्यराज बाबा आराध्य, संतराज बाबा कोल्हेकर, केशवमुनी अमृते, हरिपाल विद्वांसबाबा, साधेराज बाबा आरध्ये, विजयराज अमृते, इत्यादी संत महत उपस्थित होते तर गावातील माजी सरपंच विनोद पंचभाई हे प्रामुख्याने होते या कार्यक्रमाचे आयोजन प. पु. म.गोविंदराजबाबा,रिध्यपुरकर उर्फ विजयराज दादा पंजाबी यांनी केले

Copyright ©