Breaking News महाराष्ट्र राजकीय

*कोरोना लसीकरणासाठी PM मोदी सरकारचं प्लॅनिंग, मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक*

 

 

नवी दिल्ली, 11 जानेवारी: एकीकडे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांच्या संख्येत देशात वाढ होत असतानाच दिसाला देणारी बातमी आहे. 16 जानेवारीपासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज चर्चा करणार आहेत. सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

 

कोरोनाच्या लसीकरणाचा मोदी सरकारचा नेमका प्लॅन काय असेल आणि सर्व राज्यातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरण मोहिमेबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. कोरोनाच्या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी सशर्त मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत आज संवाद साधणार आहेत. 16 जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरणाची एक भव्य मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली स्वदेशी लस कोवॅक्सीनचा समावेश असणार आहे. या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

Copyright ©