Breaking News यवतमाळ राजकीय

*आर्णी तालुक्यातील जवळा गावात एकाच वार्डात सहा पॅनल*

 

 

 

आर्णी ता. प्र.

 

आर्णी तालुक्यातील 66 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या असुन उमेदवारांच्या प्रचाराला सुरवात झाली आहे.

आर्णी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले जवळा गावांमध्ये सर्वच पक्षाचे नेते असल्याने सर्वच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे..

जवळा गावात एकूण पाच वार्ड आहे व एकूण पंधरा सदस्यांची निवड मतदारांना येथे करावयाची आहे

गावातील पाचही वार्डा पैकी सर्वात मोठे वार्ड म्हणजे वार्ड क्रमांक पाच हे आहे व या वॉर्डामध्ये एकुण सहा पॅनल पडले आहे व एक अपक्ष उमेदवार आहे त्यामुळे गावातील बाकी वार्डाच्या तुलनेत एकाच वार्डात सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

त्यामूळे समस्त गावाचे लक्ष या एका वार्डाकडे लागले आहे

या वार्डात नागरिकांचे अनेक प्रश्न असुन अनेक दिवसापासुन त्या नागरिकांना वा-यावर सोडण्यात आले आहे

त्यामूळे नागरिक आता आपले प्रश्न मांडण्यासाठी नविन चेह-याच्या शोधात असल्याचे मतदारांमधून ऐकायला मिळत आहे

 

 

*एकाच वार्डात सहा पॅनल असल्याने मतदारात गोंधळ*

 

वार्ड क्रमांक पाच मध्ये सहा पॅनल असल्यामुळे मतदार गोंधळल्या जात आहे कारण मतदाराच्या घराच्या आजूबाजूला उमेदवाराचे घर असल्याने नेमके मत कोणाला द्यावे ही एकच चर्चा ऐकायला मिळत आहे त्यामुळे विविध समीकरण जोडणाऱ्या नेत्यांना इथे फटका बसण्याची शक्यता आहे.

 

बॉक्स करावा

*अपक्ष उमेदवार बिगडवणार सहा ही पॅनल चा गणीत*

 

वार्ड क्र 5 मध्ये एकुण सहा पॅनल असल्यामुळे मतदार हा गोंधळल्या गेला आहे.त्यातल्या त्यात येथे सहा पॅनलची अपक्ष उमेदवारा बरोबर लढत आहे.वार्डातील अपक्ष उमेदवाराकडे मतदारांचा वाढता कौल पाहता अपक्ष उमेदवार पॅनल चे गणीत बिघडवणार यात तिळमात्र शंका नसल्याचे जाणकारां कडून ऐकायला मिळत आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©