महाराष्ट्र

*भारतीय खेळाडूंवर पुन्हा वर्णद्वेषी टिप्पणी, सिडनीमध्ये खेळ थांबला*

 

 

सिडनी 10 जानेवारी मुंबई प्रतिनिधी – मॅचच्या चौथ्या दिवशीही मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका करण्यात आली. यानतंर सिराज आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी मैदानातल्या दोन्ही अंपायरशी चर्चा केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या खेळाडूंना पुन्हा वर्णद्वेषी टिप्पणीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सिडनी टेस्टमध्ये खेळ थांबवण्यात आला आहे. याआधी तिसऱ्या दिवशीही प्रेक्षकांमधून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वर्णद्वेषी टीका करण्यात आली होती. याची तक्रार भारतीय टीमने क्रिकेट ऑस्ट्रेलिया, अंपायर आणि आयसीसी मॅच रेफ्री यांच्याकडे केली होती.

मॅचच्या चौथ्या दिवशीही मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका करण्यात आली. यानतंर सिराज आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी मैदानातल्या दोन्ही अंपायरशी चर्चा केली. सीमारेषेवर फिल्डिंग करत असताना प्रेक्षकांमधून आक्षेपार्ह टीका करण्यात आल्याची तक्रार सिराजने केली आहे.

Featured

Copyright ©