Breaking News

*भंडारा येथील दुर्दैवी घटनेत जीव गमवणाऱ्या चिमुकल्यांना यवतमाळ येथे भावपुर्ण श्रद्धांजली…..*

 

 

घटनेची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी….अनिल हमदापुरे…

 

भंडारा येथील सामान्य रुग्णालयात शॉटसर्किट ने लागलेल्या आगीत निरागस १० बाळांनी आपला जीव गमावला .ज्या चिमुकल्यांनी अद्याप जगही नाही पाहिलं अश्या निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला,अत्यंत मन हेलवणारी दुर्दैवी घटना घडली.या चिमुकल्यांना यवतमाळ येथे स्थानिक आर्णी रोड येथे भावपुर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मनसेचे अनिल हमदापुरे , काँग्रेस चे कृष्णा पुसनाके यांची होती कार्यक्रमाचे आयोजन वसीम मवाल , प्रफुल गजबे मित्र परिवाराने केले होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला वसीम मवाल यांनी प्रास्ताविक करताना या घटनेची माहिती दिली.या प्रसंगी बोलताना मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या महाराष्ट्रात अश्या घटना घडणे हे लाजिरवाणी गोष्ट असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी सोबतच महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट व्हावे अशी मागणी शासनाकडे केली.उपस्थित सर्वांनी २ मिनिट मौन पाळून या चिमुकल्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो अशी प्रार्थना या प्रसंगी करण्यात आली.या नंतर सर्वांनी पुष्पहार , फुले अर्पण करीत मेणबत्ती लावून मनसुमनाने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने अनिल हमदापुरे,कृष्णा पुसनाके, वसीम मवाल, प्रफुल गजबे, रवी खुनकर, शैलेश सराफ, रुपेश सरडे, अकरम मवाल, मोहमद शाहेद, दद्दु राऊत, खान साहब यासह इतर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Copyright ©