Breaking News महाराष्ट्र सामाजिक

*आज ‘तिथे’ सविता इखर असत्या तर..*

 

 

पत्रकार शक्ती प्रतिनिधी मुंबई

दिनेश भोजने – 07039352497

 

मुंबई प्रतिनिधी 09

– भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशाच प्रकारची दुर्घटना 2019 साली नागपूरात घडली होती. पण त्यावेळी अधिपरिचारिका सविता इखर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नऊ नवजात बालकांना वाचवलं होतं.

 

सविता इखर (49), या अधिपरिचारिका म्हणून इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे कार्यरत आहे. खरं तर सर्वसामान्यांना हे नाव माहिती असण्याचे कारण नाही. मात्र आज त्यांची प्रकर्षाने आठवण होते ती त्यांनी केलेल्या असाधारण कर्तृत्वामुळे. 31 ऑगस्ट 2019 च्या मध्यरात्री त्या रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात कर्तव्यावर असताना तेथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. त्यावेळी त्यांनी प्रसंगावधान राखून धाडस दाखवत जीवाची पर्वा न करता नऊ नवजात शिशुना बाहेर काढण्यात यश मिळवलं होतं. हे सर्व शिशु 1 ते 15 दिवसाच्या आतील होते.

 

भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.प्राथमिक दृष्ट्या ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात असले तरी याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आले आहे.

 

राज्यात कोरोनाविरोधातील लसीकरणाची चर्चा सुरु असताना आरोग्य क्षेत्राला हादरुन सोडणारी ही घटना आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.सध्या तरी धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात आलं आहे.

 

31 ऑगस्ट 2019, ला इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे मध्यरात्री त्या रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागली. त्यावेळी सविता इखर या कामावर हजर होत्या. त्यांना ही घटना कळताच त्यांनी तात्काळ मोठी हानी टाळण्यासाठी ऑक्सिजनचे जंबो सिलेंडर बंद केले. शिवाय लहान बाळांना बाहेर काढत असताना त्यांनी बाळाचे ओळख पटणारे बॅचदेखील सुरक्षितपणे ठेवले.

 

जी मुले ऑक्सिजनवर नव्हती अशा चार मुलांना दोन्ही हातात घेऊन त्यांना प्रथम बाहेर काढले. या दरम्यान त्यांनी अनेकांना मदतीची हाक मारली. मात्र त्यांच्या मदतीला कोणी यायच्या आत सविता इखर यांनी परत आतमध्ये जाऊन अन्य पाच बलकांना सुखरूप बाहेर काढले. त्यापैकी एक बाळ केवळ दोन तासचंच होतं, त्याचे वजन 700 ग्रॅम इतकं होतं. दुर्दैवानं ते बाळ दुसऱ्या दिवशी दगावलं. इखर यांनी त्यावेळी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले होते.

Copyright ©