Breaking News यवतमाळ सामाजिक

*दारूभट्टी वर वडगाव पोलिसांची धाड,लाखोरुपायाचा साठा उध्वस्त*

 

 

वडगांव जंगल पोलीस स्टेशन अंतर्गत चीचघाट येथे गावठी दारू हातभट्टी वर पोलीसांनी धाड टाकून लाखो रुपयांची दारू व मोहाचा साडवा माल उध्वस्त करण्यात आला

सवि.

 

दि. ०९/१/२०२१ रोजी चिचघाट जंगल शिवार येथे गावठी हात भट्टी दारू वर सहा. पोलीस निरीक्षक पवन राठाेड, व पो.हे.काॅ. संतोष ढाकरगे,पो.ना. नील कमल भोसले,पो.कॅा. अक्षय डोंगरे, आशिष उइके,व कुंभार, राठोड यांच्या सह धाड टाकण्यात आली असता घटना स्थळावरून २७ ड्रम्स मधे ५० लीटर प्रमाणे १३५० लीटर सडवा मोहामाच कि.अं. १,०८,००० रु,६ मोठ्या ड्रम मधे १०० लीटर प्रमाणे ६०० लीटर सडवा मोहामाच कि. अं. ४८,००० रु,२२ पीप्यांन मधे ३३० लीटर सडवा मोहा माच कि. अं. २६४०० रू, ०३ डबक्यांन मधे मधे ६० लीटर दारू कि. अं. ६००० रू, असा ऐकून १८८४०० रू चा मुद्देमाल मिळून आला. यात आरोपी श्रीकांत अंकुश मेश्राम वय २५ वर्ष रा. चिचघाट वर कलम ६५ क, ड, फ महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या सतत धाड सत्रा मुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे

Copyright ©