Breaking News यवतमाळ सामाजिक

*जिल्ह्यात 29 जण नव्याने पॉझेटिव्ह, 26 बरे* _____________________________ *नगर पालिकांच्या विविध विषयांबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा*

*जिल्ह्यात 29 जण नव्याने पॉझेटिव्ह, 26 बरे*

_____________________________

*नगर पालिकांच्या विविध विषयांबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा*

 

यवतमाळ, दि. 9 :

गत 24 तासात जिल्ह्यात 29 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 26 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 9) एकूण 239 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 29 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 210 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 426 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13127 झाली आहे. 24 तासात 26 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12294 आहे. तर जिल्ह्यात एकूण 407 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 128492 नमुने पाठविले असून यापैकी 127795 प्राप्त तर 697 अप्राप्त आहेत. तसेच 114668 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

______________________________

 

नगर पालिकांच्या विविध विषयांबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

 

यवतमाळ, दि. 9 : जिल्ह्यातील 10 नगर पालिका आणि सात नगर पंचायतींच्या अंतर्गत येत असलेल्या विविध विषयांचा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला नगर पालिका प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड, यवतमाळ न.प.चे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, पुसदचे मुख्याधिकारी किरण सुकलवाड, दारव्हाचे धीरज गोहाड, दिग्रसचे शेषराव टाले, उमरखेडचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगाले आदी उपस्थित होते.

 

राष्ट्रीय हरीत लवादाच्या मागदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यातील 7 नगर पंचायत तसेच यवतमाळ, दारव्हा, आर्णी, घाटंजी नगर पालिकाअंतर्गत घन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याकरीता लागणारी शासकीय जमीन याबद्दल जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला. तसेच उपरोक्त नगर पालिका व नगर पंचायतींनी 20 डिसेंबरपर्यंत सर्व विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा. ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी म्हणाले, भारतीय प्रजातीच्या कडुलिंब, गुलमोहर, वड, पिंपळ आदी वृक्षांचे वृक्षारोपण करावे. तसेच नगर पालिकेच्या खुल्या जागेमध्ये सुध्दा वृक्षारोपण करा. जल घटक अंतर्गत रेनवॉटर हार्वेस्टिंग, वॉटर कन्झर्वेशन करण्यास लोकांमध्ये जनजागृती करावी. सांडपाणी प्रक्रियेसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवाव्यात. आठवड्यात एक दिवस नगर पालिकेमध्ये सायकल वर यावे तसे इतर शासकीय/निमशासकीय/व्यापारी वर्गात या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घ्यावा. जेणेकरून वायुप्रदूषण कमी होईल. सोबतच रस्त्याच्या दोन्ही बाजुला वृक्षारोपण करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

 

प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत शासकीय जागेवर अतिक्रमण नियमानुकूल करून आवास योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. तसेच आवास योजनेच्या केंद्र शासनाच्या थकीत अनुदानासाठी पाठपुरावा करण्यास सूचना दिल्या. ‘2022 पर्यंत सर्वांसाठी घरे’ देण्याच्या अनुषंगाने तातडीने उर्वरित डीपीआर तयार करण्याचे आदेश त्यांनी मुख्याधिका-यांना दिले. स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 च्या अनुषंगाने सर्व नगर पालिकांचा आढावा घेत यवतमाळ जिल्ह्यातील शहरे ओडीएफ व जीएफसी 3 स्टार रेटींग मिळवण्यासाठी महत्वाच्या सूचना दिल्यात.

 

बैठकीला जिल्ह्यातील सर्व नगर पालिका / नगर पंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

Copyright ©