यवतमाळ सामाजिक

कलर्स टी. व्ही.वाल्यांनी घातली साद.सुनिल चव्हाण यांनी दिली दाद

कलर्स टी. व्ही.वाल्यांनी घातली साद.सुनिल चव्हाण यांनी दिली दाद

G9 फिल्मस हैद्राबाद व कलर्स टी .व्ही.यांच्या संयुक्त विद्यमाने
G9 फिल्मस च्या वर्धापन दिनानिमित्त दि.13.12.2023 रोजी आय.सी.बी.एम.सभागृह आतापुर हैद्राबाद येथे नृत्य तथा गायन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नागपूर येथील कू.जस्मिन शेख हीनी कथ्थक नृत्य सादर करून उपस्थिताकडून वाह वाह मिळवली .या कार्यक्रमात एकूण वीस कलावंतांनी सहभाग घेतला होता .या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साऊथ फिल्म इंडस्ट्री चे डायरेक्टर फहीम सरकार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कोरियो डायरेक्टर राम बाबू हे होते . माळेगांव तह.आर्णी येथील ज्येष्ठ कलावंत सुनिल रामचंद्र चव्हाण यांनी फकिरा या चित्रपटातील दिलं मे तुझे बिठाके हे गीत गाऊन कलर्स टी. व्ही. च्या कर्मचाऱ्यांना वन्स मोर वन्स मोअर ची साद घालायला लावले तर सुनिल चव्हाण यांनी सुध्धा त्यांना दाद देत पुन्हा ते गीत गाऊन भारावून टाकले. या वेळी बराच प्रेक्षक वर्ग हजर होता

Copyright ©