Breaking News नागपूर

तांत्रिक कामगारांचा शासन , प्रशासना विरूध्द आकोश

तांत्रिक कामगारांचा शासन , प्रशासना विरूध्द आकोश

राज्यभरातुन तांत्रिक कामगारांची लक्षणिय उपस्थिती

कामगारांच्या मागण्या बाबत शासन स्तरावरून योग्य दखल घेणार- नामदार शंभुराज देसाई

नागपुर : महावितरण , महापारेषण , महानिर्मिती कंपनीतील तांत्रिक कामगारांच्या प्रश्नाबाबत शासन व प्रशासन कमालीचे उदासिन असल्याने व झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्याकरीता तांत्रिक कामगार युनियन र.न. 5059 च्या वतीने महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर यंशवंत स्टेडीयम नागपुर येथे दि . 22 डिसेंबर 2022 गुरूवार एक दिवशीय आकोश आंदोलन करण्यात आले . यामध्ये राज्यभरातून आलेल्या तांत्रिक कामगारांनी शासन व प्रशासनाच्या विरोधात आकोश व्यक्त करीत घोषणा देत एकच हल्लाबोल केला असल्याची माहीती तांत्रिक कामगार युनियन र.नं. 5059 चे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिली आहे .. मुलंड , ठाणे , पनवेल , खारघर तळाजा उरण व जेएनपीटी विभागातील विज वितरणाचा परवाना अदाणी समुहाला तसेच ईतर विभाग खाजगी कंपनीला देऊ नये या करीता महावितरण कंपनीने विरोध दर्शवावा , महानिर्मिती कंपनीकडील 35 वर्ष आयुर्मान झालेली जल विद्युत केंद्रे नुतनीकरण करून परिचलनासाठी खाजगी उद्योजकांना देण्याचा पाटबंधारे विभागाचा मानस आहे . ती सर्व जल विद्युत केंद्रे महानिर्मिती कंपनीने स्वतः नुतनीकरण करून पाटबंधारे विभागाला जादा पाणी आकार ( रट ) देऊन आपल्या कडे चालविण्यासाठी ठेवावीत . स्वतंत्र वेतन श्रेणी – तांत्रिक कामगारांना 166 ( P ) नुसार मिळणाऱ्या दोन अतिरिक्त वेतनवाढी चालु वेतन श्रेणी मध्ये वर्ग करून त्यांची कोणताही आर्थिकमार नसलेली स्वतंत्र वेतन श्रेणी लागु करावी , महावितरण कंपनीमधील तांत्रिक कामगारांवर वसुली करीता होणारी दडपशाही व एकतर्फी कार्यवाही त्वरीत थांबवावी , घरगुती वाणिज्य औद्योगिक व शेतीपंप विज ग्राहकांची थकबाकी वसुली करणे करीता असलेली अधिकारी / अभियंता / जनमित्र यांची जबाबदारी निश्चित करावी तांत्रिक कामगारांच्या संख्येनुसार आधुनिक टी . अॅन्ड पी . व सुरक्षा साधणे पुरविण्यात यावी , सन 2018 ते 2023 हया पगार वाढ कराराप्रमाणे वर्ग 3 व 4 मधील तांत्रिक कामगारांना वाढीव इंधन भत्ता त्वरीत लागु करावा तसेच तांत्रिक कामगारांना महीण्याला 20 लिटर प्रमाणे इंधन भत्ता देण्यात यावा व तांत्रिक कामगारांना फिल्डवर काम करण्यासाठी कंपनीच्या वतीने ईलेक्ट्रीकल बाईक पुरविण्यात याव्या , महावितरण कंपनीमध्ये यंत्रचालकांची पदे सरळ सेवा भरती व्दारे न भरता 100 टक्के पदे वर्ग 4 मधील तांत्रिक कामगारांमधुन भरण्यात यावे कंपनी मधील कार्यरत चतुर्थ श्रेणीतील तांत्रिक कामगारांना महानिर्मीती व महापारेषण प्रमाणे तृतीय श्रेणीमध्ये पदोन्नत करण्यात यावे , प्रलंबित असलेले अनुकंपातत्वावरील प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यात यावे , दि . 01/04/2019 नंतर कार्यान्वीत झालेले उपकेंद्र खाजगी रित्या चालविल्या जात आहे . सदरहु उपकेद्रामध्ये त्वरीत कंपनीचे यंत्रचालकांचे पदे मंजुर करण्यात यावे , राज्य शासनाच्या ईतर आस्थापना प्रमाणे तिन्ही कंपनीतील कामगारांच्या विनती / वैद्यकीय / पती – पत्नी एकत्रीकरण बदल्या बाबत तात्काळ कार्यवाही व्हावी , महावितरण कंपनीतील तांत्रिक कामगारांनी पदोन्नती नाकारल्यास उच्च वेतनश्रेणीचे लाभ महानिर्मिती व महापारेषण कंपनीप्रमाणे संरक्षित करण्यात यावा , तिन्ही कंपनीतील उच्च शिक्षित पदवी / पदविकाधारक तंत्रज्ञ / यंत्रचालका साठी Internal Notification पदे भरती प्रकीया राबविण्यात यावी . महावितरण व महापारेषण मधील यंत्रचालकांच्या मे प्रोटेक्ट मध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे . त्यामुळे महावितरण मधील यंत्रचालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे . तरी महापारेषण प्रमाणे महावितरण मधील यंत्रचालकांचे पे प्रोटेक्ट करण्यात यावे , तांत्रिक कामगारांचे सन सन 2022-2024 चे रजा रोखीकरण दिलेल्या लेखी आश्वासनानुसार त्वरीत अदा करण्यात यावे , 33/11 के.व्ही . उपकेंद्राला सुरक्षा रक्षक पुरविण्यात यावी , निष्काशित केलेले वाशीम व ईतर विभागीय भरारी पथके पुर्वरत ठेवुन वळविण्यात आलेले मंजुर पदे पुन्हा अबाधित ठेवण्यात यावे , 33/11 के.व्ही . उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेले प्रधान यंत्रचालक व वरिष्ठ कामाचे स्वरूप समान आहे . त्यामुळे प्रधान / वरिष्ठ यंत्रचालकांची ( विनंती / प्रशासकीय / पदोन्नती ) पदस्थापना कोणताही दुजाभाव न दाखवता सर्व उपकेंद्रामध्ये पदस्थापना देण्यात यावी , प्रत्येक झोन मधील वितरण केंद्र ( शाखा कार्यालय ) व उपविभागीय कार्यालयाची वीज ग्राहक संख्या चे सर्वेक्षण करून कार्यालय संख्येमध्ये वाढ करण्यात यावी , कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावुन घ्यावे तसेच सरळ सेवा भरती मध्ये आरक्षण देण्यात यावे , प्रभारक श्रेणी 1 व 2 आणि राज्य जेष्ठता असणाऱ्या तंत्रज्ञ 3 यांचे पदोन्नती पॅनल लवकरात लवकर घेऊन वंचित कर्मचाऱ्यांना न्याय यावा , महापारेषण कंपनीतील तांत्रिक कामगार अधिकारी , कर्मचारी वकिंग नॉमर्स ठरविण्यात यावे , अपंग कर्मचाऱ्यांना शासन निर्णया प्रमाणे सोयी सवलती देण्यात याव्या , एल.टी.सी.मध्ये आई वडिलांचे नावे समाविष्ठ करण्यात यावे . तसेच सुधारीत यंत्रचालकांचे करतांनादराचा लाभ कामगारांना देण्यात यावा , चतुर्थ श्रेणीतील कामगारांचे सॅप अकाऊंट निर्माण करणे आदी प्रलंबित प्रश्न व तांत्रिक कामगारांच्या समस्याबाबत अनेक वेळा शासन व प्रशासनाला निवेदनाव्दारे कळविण्यात आले आहे . तरी सुध्दा कामगारांचे प्रश्न मार्गी न लावल्याने तिन्ही कंपनीतील तांत्रिक कामगारांमध्ये प्रचंड प्रमाणात आकोश निर्माण झाला असल्याने महाराष्ट्र विधानसभेच्या नागपुर हिवाळी अधिवेशनावर यशवंत स्टेडीयम येथे 22 डिसेंबर 2022 रोजी एक दिवशीय आकोश आंदोलन करण्यात आले . आंदोलनामध्ये राज्यातिल तिन्ही कंपनीच्या तांत्रिक कामगारांनी मोठया संख्येनी सहभाग नोंदविला . प्रशासनाने तात्काळ प्रश्न मार्गी न लागल्यास येणाऱ्या काळामध्ये अधिक तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा तांत्रिक कामगार युनियन थे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे , उपाध्यक्ष बी . आर . पवार , गोपाल गाडगे , सतिश भुजबळ , सरचिटणीस प्रभाकर लहाने , उपसरचिटणीस नितीन चव्हाण , संजय उगले , शिवाजी शिवणेचारी , केंद्रीय संघटक महेश हिवराळे , राज्य सचिव आनंद जगताप , रघुनाथ लाड , केंद्रीय कोषाध्यक्ष गजानन पाटील अघम , मुख्य कार्यालय प्रतिनीधी विक्रम चव्हाण , संजय पाडेकर , तांत्रिक टाईम्स चे संपादक सुनिल सोनवणे , उपसंपादक विवेक बोरकर , किरण होती . कन्हाळे , प्रकाश वाघ यांनी दिला आहे . यावेळी आक्रोश आंदोलनात राज्यभरातुन तांत्रिक कामगारांची लक्षणीय उपस्थिती होती

___________________________
आंदोलनाची दखल घेत माननिय मुख्यमंत्री यांच्या वतीने नामदार शंभुराज देसाई यांनी युनियनच्या शिष्टमंडळाला चर्चे करीता पाचारण केले . तांत्रिक कामगारांच्या प्रलंबित प्रश्न व मागण्या बाबत शासन सकारात्मक असुन शासन स्तरावर योग्य ती दखल घेवुन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले .

___________________________
शासन व प्रशासनाचे कामगारांच्या विरूध्द आखले जाणारे धोरण हे तिन्ही कंपनीला व कामगारांना उध्वस्त करण्याचे षडयंत्र आहे . नफयामध्ये असलेल्या विभागाचे खाजगीकरण , जल विद्युत केंद्राचे खाजगीकरण , तांत्रिक कामगारांवर | होत असलेली दडपशाही एकतर्फी कार्यवाही , मंजुर केलेला वाहन भत्ता अदा न करणे , कोणतेही आर्थीर भार नसलेली स्वतत्र वेतन श्रेणी , खाजगी रित्या चालविण्याकरीता दिलेल्या 33 के . व्ही . उपकेद्रामध्ये यंत्रचालकांचे पदे मंजुर करण्यात यावे व ईतर प्रश्न हेतुपुरस्पर प्रलंबित ठेवण्यात येत आहे . तांत्रिक कामगारांनी व्यक्त केलेल्या आकोश आंदोलनाची तिव्रतेची वेळीच दखल घ्यावी व कामगारांचे प्रश्न सोडविण्याबाबत कार्यवाही करावी अन्यथा कामगारांच्या असंतोषाचा व आकोशाचा विस्फोट होईल होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील .
प्रभाकर लहाने
सरचिटणीस तांत्रिक कामगार युनियन

Copyright ©