यवतमाळ सामाजिक

भरदीवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी

तालुका प्रतिनीधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

भरदीवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी

काही युवकांच्या व पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीस रंगेहाथ पकडले

घाटंजी येथील रहिवाशी महिला शाळा आटोपून घरी जात असताना एस पी एम गिलानी कॉलेज जवळील गावंडे यांच्या घरा समोर सुमारे दुपारी 1 च्या दरम्यान आरोपी जिवन विष्णु गेडाम वय 25 याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने ओढून पळ काढण्यास प्रयत्न केला असता महिलेने सतर्कता दाखवत आर्डा ओरडा केला आसता काही स्थनिक ओळखीच्या वेक्तीने आरोपीचा पाठलाग केला तेव्हा पर्यंत सदर वार्ता घाटंजी पोलीस स्टेशनला काही प्रतेक्ष दर्शिनी कळविली घाटंजी तील कर्तव्य दक्ष ठाणेदार शुषमा बाविस्कर मॅडम यांनी सतर्कता दाखवत सहकार्या च्या मदतीने आरोपीस रंगेहाथ पकडले आरोपीची झाडा झडती घेतली आसता आरोपी जीवन विष्णु गेडाम यांच्या खिशातून तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळ सूत्र आढळून आले त्यानुसार कारवाई करत कलम 392 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीची कसून चौकशी केल्यास आणखी काही गुन्हा चा सुगावा लागू शकतो सदर कारवाईस घाटंजी पोलिसांनी तत्परता दाखविली त्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©