नागपूर सामाजिक

शिंपी समाजाचा हीवाळी अधिवेशणवर धडकला भव्य मोर्चा

तालुका प्रतिनीधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

शिंपी समाजाचा हीवाळी अधिवेशणवर धडकला भव्य मोर्चा

घाटंजी: शिंपी समाजातील
सर्व जाती पोटजाती च्या उत्थाणासाठी व न्याय हक्कासाठीच्या शासन स्तरावरिल प्रलंबीत मागण्या शासनाने त्वरित निकालात काढुन शिंपी समाजास न्याय द्यावा याकरिता दीनांक २३.१२.२२ रोज शुक्रवार ला शिंपी समाज संघर्ष समिती म.रा. आयोजीत भव्य मोर्चा हीवाळी अधिवेशनवर धडकला. शिंपी समाजाची आर्थिक जातणिहाय जनणगणना व्हावी.रेडीमेटमुळे व शासनाच्या जागोजगी शिलाई मशिन वाटप धोरणामुळे पुरता कंबरड मोडलेल्या शिंपी व्यवसायाला आर्थिक हातभार मिळावा यासाठी संत नामदेव महाराज आर्थीक विकास महामंडळ स्थापण करण्यात यावे. विद्यार्थी वर्गासाठी एस. सी. एस. टी प्रमाणे आरक्षण मिळावे व वस्तीगृहात आरक्षीत जागा देण्यात याव्या. आो बी सितुन विभाजन करून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. यासारख्या ईतरही समाज उत्थाणा करिताच्या मागण्या या मोर्चातुन करण्यात आल्या. सदर मागण्याचे निवेदन मा. मुख्यमंत्री यांणा मा मंत्री उदयजी सामंत यांच्या माध्यमातुन देण्यात आले. मोर्चाचे नैतृत्व
रवि वांड्रसवार अध्यक्ष,सुनिल लाचरवार, अणिलभाऊ अक्केवार संघटक/ संयोजक वणी, दिपक दीकुंडवार ,कैलास कर्णेवार,न्यानेश्वर गटलेवार मुख्य संयोजक, चंद्रशेखर नोमुलवार, महेश पवार, संजय दिकुंडवार, रवि नस्कुलवार पांढरकवडा, सौ. मिनाक्षी पोटपिल्लेवार, विलास गटलेवार कवडुजी पोटपिल्लेवार, संतोष राजुलवार पाटणबोरी, व ईतरही समाज शाखा विभाग संघटक यांच्या माध्यमातुन करण्यात आले. मोर्चात विशेष म्हणजे महीलाचा विवीध भागातुन लाक्षणीक सहभाग घेत नवे पर्व शिंपी सर्व च्या घोषनाणी मोर्चा मार्ग दनाणुन गेला होता. मोर्चा यशस्वीतेसाठी सचिव सचिन कर्णेवार, स्वप्निल नोमुलवार, आशिष कर्णेवार, दत्ता पोटपेलीवार, शंकरजी पोटपिल्लेवार, रोहीत बुरेवार यांणी अथक परिश्रम घेतले.

Copyright ©