यवतमाळ सामाजिक

बालकांचे प्रश्न संवेदनशीलपणे हाताळणे व बालकांसोबत संवाद ठेवणे अत्यंत गरजेचे – जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर

बालकांचे प्रश्न संवेदनशीलपणे हाताळणे व बालकांसोबत संवाद ठेवणे अत्यंत गरजेचे
– जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर

तेंडोळी येथे बालकांसाठी खास व्याख्यानमाला दिवस तुझे हे फुलायचे

आजचे बालक हे देशाचे भविष्य आहे त्यामुळे बालकांना समाजात पोषक व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याकरीता नागरिकांनी प्रयत्नशील असावे. बालकांचे प्रश्न संवेदनशीलपणे हाताळणे व बालकांसोबत नियमित संवाद असणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी केले.

पूज्य साने गुरुजी जयंती निमित्त आर्णी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत व्हाट्सएप ग्रुप सुविचार: संस्कार कलश, ग्रामपंचायत तेंडोळी व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या संयुक्त विद्यमाने बाल दोस्तांसाठी *दिवस तुझे हे फुलायचे* हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते

ते पुढे म्हणाले की, मुलांमध्ये दिसणार्या भावना वास्तविक व सशक्ता असतात. एखादी गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे झाली नाही तर त्यांना विलक्षण दुःख होते. मुले साधारणापणे अंधाराला किंवा अनोळखी व्यक्तींना घाबरतात. मुलांच्या मताची किंवा भावनांची टिंगल केली, दुर्लक्ष केले किंवा त्याबद्दल त्यांना शिक्षा केली तर मोठेपणी अशी मुले लाजाळू किंवा घाबरट बनतात तसेच त्यांना आपल्या भावना नीटपणे व्यक्त करता येत नाहीत. मुलांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास पालकांनी किंवा संगोपनकर्त्यांनी संयमाने व सहानुभूतीने परिस्थिती हाताळल्यास अशी मुले आनंदी बनतात व त्यांची मनस्थिती संतुलित राहते. तेव्हा या बाबींकडे पालकांसह सर्व समाजाने जाणीवपूर्वक बघितले पाहिजे. तेव्हाच देशाचा उद्याचा आधारस्तंभ सक्षम होईल.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ सपनाताई रविशंकर राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख राजू परमार आणि मार्गदर्शक म्हणून जिल्हा बाल शिक्षण अधिकारी देवेंद्रजी राजुरकर, लेख लेखक कवी नाटककार तथा आकाशवाणी कार्यक्रमाधिकारी जयंत कुमार शेटे, क्रीडाशिक्षक एम.डी.जाधव, विज्ञान शिक्षक मनोहरजी पावसे आणि ज्येष्ठ साहित्यिक नागोरावजी कोम्पलवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य परसराम राठोड, संतोष आडे, विद्याताई कोलते, जयेश पळसकर, ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर, मुख्याध्यापक निर्मलचंद तिवारी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांनी केले त्यात त्यांनी गावांच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्र संघाने घालून दिलेले बाल स्नेही गाव हे ध्येय गाठत असतांना बालकांना सोबत घेऊन त्यांच्या विकासासोबतच गावाचा विकास साध्य करण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी काजल रवींद्र राठोड श्रावणी विनोद कुंबरे आदिती गणित माधुरी निकुरे शितल पवार दिव्या तराटे ऋतुजा नागोसे अपर्णा जाधव अनुष्का राठोड या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. तर अमृता झुरे, मयुरी मळके, दीक्षा डोंगरे, ऋतिका कोलते, प्रियांशू जाधव,अस्मिता झुरे या विद्यार्थ्यांनी साने गुरुजींच्या जीवनावर विचार व्यक्त केले.

यानंतरच्या मार्गदर्शनामध्ये एम.डी. जाधव सर यानी प . पू . साने गुरुजी लीखीत ‘ शामची आई ‘ मराठी मुलासमोर संस्काराची खाण घेऊन आली.” देणार्‍याचे हात हजार , दुबळी माझी झोळी ” दाता समोर आहे . दातृत्व शामच्या आईच्या संस्कार मुल्यातून भरभरून ओसंडत आहे फक्त घेणाऱ्याला या संस्कार खाणीचे महत्व समजले पाहीजे. असे मत व्यक्त केले.
तर महाराष्ट्र शिक्षण विभागा अंतर्गत निदान महाराष्ट्रातील प्राथमीक शाळेला “शामची आई ” हा ग्रंथ (पुस्तक ) पुरविण्यात आल्यास लहान बालकांच्या मनात संस्कार मुल्य रुजविण्यासाठी याची मदत होइल. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

तर जयंतकुमार शेटे यांनी मुलांनी स्वतःची आवड ओळखायला हवी. दुसर्‍याचं म्हणने ऐकावे पण स्वतःच्या मनाचेच योग्य ते करावे. स्वतःचे दोष समजून घ्यायला हवेत. आणि स्वतःचे गुण आणखी विकसीत करायला हवेत. हा गुरुमंत्र दिला.

सूत्रसंचालन शिवानी शेलोटे आणि काजल राठोड हिने तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक निर्मल चंद तिवारी यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकासगंगा संस्थेच्या समन्वयक कु.स्वाती राठोड, खडीकर सर, शाळेच्या शिक्षिका ए. एन.वनकर, एस.जी.भस्मे, ग्रामपंचायत कर्मचारी महादेव कोलते, जितेश चव्हाण, शिवाजी कोलते, सुशील निकुरे यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमास उमेद अभियानाच्या महिला वर्ग, बाल विकास विभाग, आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पत्रकार बांधव, विध्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©