महाराष्ट्र सामाजिक

गवळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय राज्यस्तरीय धरणे आंदोलन सम्पन्न.

गवळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय राज्यस्तरीय धरणे आंदोलन सम्पन्न.

गवळी समाज बांधवांचे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यात विविध मागण्या ठेऊन हे आंदोलन
हिरामण अप्पा प्रदेश अध्यक्ष, आदरणीय अशोक जी भाले प्रदेश कार्याध्यक्ष,आदरणीय अशोकजी मंडले,प्रदेश सचिव, प्रवीण जी हुंडीवाले,यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ कार्यकर्ते मदनजी साखरकर, रामजी मोरे, मन्नूजी यादव यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी आयोजन करण्यात आले, धरणे कार्यक्रमाला पाठींबा व मार्गदर्शन करण्यासाठी गवळी समाजाचे समाजभूषण आमचे मार्गदर्शक आदरणीय हंसराज जी अहीर, आदरणीय आदीती ताई तटकरे ( आमदार),आदरणीय पोटे जी (माजी आमदार) यांनी उपस्थित राहून समाज बांधवांना मार्गदर्शन केले, या एक दिवसीय धरणे कार्यक्रमाला, महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या,
या कार्यक्रमाची सम्पूर्ण व्यवस्था म ग स संघटना, नागपूर शहर , ग्रामीण व महिला आघाडी च्या सर्व कार्यकर्त्यांनी यशस्वी पणे सांभाळली,या वेळी हजारो गवळी समाजाचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©