Breaking News यवतमाळ सामाजिक

भारतीय स्टेट बँक चे सुरक्षा रक्षक बेजवाबदार,बँकेच्या खातेदारांवर केला बंदुकीच्या संगीनीने वार

दिग्रस

 

दिग्रस येथील भारतीय स्टेट बँक च्या ग्राहकांना नेहमी  त्रास सहन करणे नित्याचे झाले आहे.भारतीय स्टेट बँक  च्या ग्राहकांना कधी कर्मचाऱ्यांन कडून तर कधी अधिकाऱ्यांन कडून नाहक त्रास दिल्या जातो.आपल्याच घामाचे पैसे जमा करणे किंवा काढण्या साठी दीड ते दोन तास लाईन  मध्ये सिस्तीने उभे राहून  प्रत्येक खातेदार नियमाचे पालन करतोय मात्र बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यां कडून बँकेच्या खातेदारांना आपुलकीची वागणूक मिळत नाही. एखाद्या खातेदाराने असुविधे बद्दल प्रश्न केल्यास बँकेचे कर्मचारी त्या खातेदाराला दमदाटी करतात.मात्र या ही पुढे जाऊन बँकेच्या सुरक्षारक्षकाने एका खातेदारास बंदुकीच्या संगिनीने वार करून घायाळ केले.भारतीय स्टेट बँक चे खातेदार दिग्रस शहरातील हसबे गुरुजी काल दिनांक 16/12/2020 बुधवार रोजी बँकेत पैसे भरण्याकरिता गेले असता पैसे भरून एका कर्मचाऱ्यास नवीन पासबुकची मागणी केली.त्या कर्मचाऱ्याने हसबे गुरूजींना एक तासाने येऊन  नवीन पासबुक घेऊन जा असे सुचविल्याने हसबे गुरुजी एका तासाने बँकेत गेले असता. सुरक्षा रक्षक दिलीप आडोळे यांनी हसबे यांची मान धरून अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की देत बँकेच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करत असतांना हसबे गुरुजी यांनी सुरक्षा रक्षकांना काही सांगण्याचा प्रयत्न करण्या आधीच.सुरक्षा रक्षकाने हसबे गुरुजींना हिसका देऊन त्यांच्यावर बंदुकीच्या समोरील संगिणीने वार केला केलेला वार टाळण्यासाठी हसबे गुरुजींनी तो वार आपल्या डाव्या हातावर घेतल्याने त्यांच्या हाताला गंभीर ईजा झाली.बँकेच्या सुरक्षा रक्षकाने खातेदारास जखमी केल्या चे कळताच बँकेतील कर्मचारी सुरक्षा रक्षकाने केलेल्या कृत्यावर पांघरूण घालण्या साठी हसबे गुरुजीला विनवणी करू लागले. मात्र हसबे गुरुजी यांनी त्यांच्या विनवणीला कुठलीही दाद न देता पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देत असताना बँकेचे दोन अधिकारी पोलीस स्टेशनला येऊन झाल्या प्रकाराची आम्ही दखल घेतो व आमच्या परीने सुरक्षा रक्षकावर होईल ते कारवाई करतो आपण आपली तक्रार मागे घ्या वाटल्यास त्यांच्या कडून आम्ही माफी मागतो अशी विनवणी करू लागले,आज मी माझी तक्रार मागे घेतल्यास भविष्यात या सुरक्षा रक्षका कडून इतर कोणा सभासदावर असा हल्ला होणार नाही याची शाश्वती कोण घेणार असा उलट प्रश्न हसबे यांनी करतातच बँकेचे दोन्ही अधिकारी निशब्द झालेत.रात्री 7 वाजेपर्यंत सुरक्षा रक्षक दिलीप आडोळे यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता,बंदुकीच्या संगिणीने केलेल्या संगीन गुन्ह्यात सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल होईल का या कडे नागरिकांनचे लक्ष लागून आहे

………..  ….…….   ………….

त्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे त्यानी केलेला वार मी माझ्या हातावर झेलला नसता तर संगीत माझ्या पोटात खुपसली असती,त्या मग्रुर सुरक्षा रक्षकावर कठोर कारवाई झालीच पाहिजे

*हसबे गुरुजीयांची मागणी*

Copyright ©