Breaking News

त्या तरुणाचा कारखान्यातच झाला खुन, खुन करणारा कोण?

तरूण सुरक्षा रक्षकाच्या मारहाणीत ठार, मांगुळ कारखान्यातील घटना
यवतमाळ: कारखाना पाहण्यासाठी गेलेल्या एका ऊस कामगाराला वॉचमनने केलेल्या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ तालुक्यातील मांगुळ साखर कारखान्यात शनिवार, दि. २८ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास घडली. शंकर आडे रा. पार्डी चुरमुरा ता. उमरखेड असे मृताचे नाव अाहे.या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी वॉचमन शालिक कुमरे रा. जवळा याला अटक केली असून न्यायालयाने तिन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. उमरखेड तालुक्यातील ऊस कामगार पवन चव्हाण आणि शंकर आडे दोघेही कामाकरिता यवतमाळ तालुक्यातील मांगुळ येथे असलेल्या साखर कारखान्यात आले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास दोघेही कारखाना बघण्यासाठी निघाले. यावेळी त्या ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या वॉचमन शालिक कुमरे याने त्या दोघांना हटकले. मात्र, त्यांनी वॉचमनचे म्हणने न ऐकता कारखाना पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी वॉचमन शालिक कुमरे याने त्या दोघांना लाथाबुक्याने मारहाण केली. या मारहाणीत शंकर आडे बेशुद्ध पडल्याने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान त्याला यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. ऊस कामगाराचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे कळताच वॉचमन शालिक कुमरे याने त्या ठिकाणाहून पळ काढला. या प्रकरणी पवन चव्हाण यानी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी वॉचमन शालिक कुमरे याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला. अशाच रविवारी वॉचमन कुमरे हा घाटंजी तालुक्यातील लहान केळापूर येथील नातेवाईकांकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून रविवारी ग्रामीण पोलिसांनी घाटंजी गाठून वॉचमन शालिक कुमरे याला अटक केली. दरम्यान ग्रामीण पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई प्रभारी ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी जयंत ब्राम्हणकर, संजय राठोड, सुरेश झोटिंग यांनी पार पाडली.

Copyright ©