Breaking News

वडकी परिसरात दुर्दैवी घटना, पोलिस गुन्हा दाखल करण्याची तयारीत

भरधाव बोलेरोची दुचाकीला जबर धडक.
एक ठार तर दोन जण गंभीर जखमी.
यवतमाळ,प्रतीनीधी
वडकी येथून मुद्दापुरकडे जाणाऱ्या दुचाकी स्वाराला एका भरधाव बोलेरो वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकी वरील एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले.हि घटना ३० नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान राळेगाव वडकी मार्गावरील खडकी गावाजवळ घडली.
किसन बल्की (५५) रा.मुदापुर असं या अपघातात ठार झालेल्या इसमाचे नांव असुन किसन शामराव घोंगडे (४०) आष्टोना व ताईबाई बल्की (५०) रा.मुदापुर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे तिघेही दुचाकी वाहन क्रमांक एम.एच.३४ क्यू.९१७० ने वडकी कडून मुदापुर कडे जात असताना राळेगाव वडकी मार्गावरील खडकी येथील चहांद फाट्यावर मागाहून येणाऱ्या बोलेरो वाहन क्रमांक सी.जी.०७ बी.एम.०९१२ या वाहनाने जबर धडक दिली.या धडकेत दुचाकीवरील तिघेही जण गंभीर रित्या जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात नेले असता किसन बलकी यांचा मृत्यू झाला.तर इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असुन प्रकृती गंभीर असल्याचे कळते.या घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला व अपघात ग्रस्त वाहन पोलिस ठाण्यात जमा केले होते.दरम्यान घटनास्थळावरुन बोलेरोचा चालक फरार झाला असल्याचे कळते.या प्रकरणी वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती

Copyright ©