Breaking News

नगर पालिकेत विना माक्स नागरिकांचा मुक्त संचार कसा,पालिकेने लावलेल्या फलकाचा होतोय हसा

 

सदानंद जाधव दिग्रस

गेल्या मार्च महिन्या पासुन पासून कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे
दिग्रस तालुक्यामध्ये शेकडो नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती.दहा ते बारा नागरिकांना कोरोना आजारामुळे आपला जीव गमवावा लागला .मात्र अशा परिस्थितीत असताना सुध्दा दिग्रस शहरासह तालुक्यात नागरिकांत कोरोना चे भयच दिसून येत नाही. दिग्रस मध्ये कोरोना बाधित रुग्ण मिळणे हे नित्याचे झाले असून दिग्रस नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर “नो मास्क नो एंट्री” असा फलक दर्शनी भागात नुसता शोभेकरिता लावल्याचे दिसून येत आहे कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नसताना सुद्धा कुणालाही भीती राहीलेली नाही परंतु वेळोवेळी शासनाच्या सूचनेचे पालन करण्याचे गरजेचे असताना नगरपालिकेमध्ये कर्मचाऱऱ्यासह नागरिकांचा माक्स विना मुक्त संचार करताना दिसत आहे, राज्य शासन पुन्हा लॉक डाऊन करण्याची मनस्थितीत आहे मात्र स्थानिक अधिकारी आपल्या कर्तव्याला बगल देऊन हमे क्या करना अशा मानसिकतेत दिसुन येत आहे

Copyright ©