यवतमाळ सामाजिक

गिलानी महाविद्यालयात मतदार जागरण विशेष शिबिर

तालुका प्रतिनिधी सुशांत निवल

गिलानी महाविद्यालयात मतदार जागरण विशेष शिबिर

घाटंजी : तहसील कार्यालय घाटंजी व राष्ट्रीय सेवा योजना शि. प्र. मं. विज्ञान व गिलानी कला, वाणिज्य महाविद्यालय घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागरण विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये विशेषतः १८ वर्षा वरिल विद्यार्थ्यांना मतदान कार्ड काढण्याकरिता फॉर्म नंबर ६ बद्दल विस्तृत माहिती देऊन मतदान व मतदार यांचे देशविकास करिता किती महत्व आहे, तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकाला, शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी या सर्वांना मतदार यादीत आपले नाव येण्या करिता व मतदानाचा संविधानिक हक्क मिळण्याकरिता फॉर्म नंबर ६ भरणे गरजेचं आहे हा फॉर्म नंबर ६, ऑन लाईन पद्धतीने अँप च्या साहाय्याने व ऑफ लाईन तहसिल कार्यालयात संपुर्ण माहिती भरून जमा करावा अशा प्रकारचे मार्गदर्शन व माहिती घाटंजीचे मा. तहसीलदार श्री विजय साळवे साहेब यांनी दिली, यावेळी नायब तहसिलदार श्री दिलीप राठोड साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. शहेजाद, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. चंद्रशेखर आर. कासार, मंचावर उपस्थित होते, प्राचार्य डॉ. एम. ए. शहेजाद सर यांनी सर्व विदयार्थ्यांना मतदार फॉर्म नंबर ६ भरण्याचे आव्हाहन अध्यक्षिय भाषणातून केले, या विशेष शिबीराचे संचालन प्रा. डॉ. सी. आर. कासार सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री दिलीप राठोड नायब तहसिलदार घाटंजी यांनी मानले शिबिरात मोठया संख्येने महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Copyright ©