राजकीय सामाजिक

साखरा ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा ग्रामविकास आघाडीचा झेंडा

तालुका प्रतिनिधी सुशांत निवल

साखरा ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा ग्रामविकास आघाडीचा झेंडा

—————————————

नंदाताई गाऊत्रे यांची सरपंच पदी निवड झाली परंतु मानकर गटांचे केवळ दोन सदस्य असतांना त्यांच्या गटातील अनुप वसाके यांना चार मते मिळाली कुठून आणि एक मत नोटाला कोणी दिला असेल याचीच चर्चा गावातील चौका चौकात रंगत असल्याचे चित्र दिसत आहे

घाटंजी: तालुक्यातील अत्यंत राजकीयदृष्ट्या प्रतिष्टेची आणि महत्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदी पुन्हा एकदा ग्रामविकास आघाडी पॅनलचा झेंडा फडकला असून सौ.नंदा ग्यानीदास गाउत्रे यांची सरपंच पदी निवड झाली.2020 मध्ये साखरा ग्रामपंचायतची सार्वत्रित निवडणूक झाली होती त्यात मानकर गटाचा दणदणीत पराभव करत ग्रामविकास आघाडीचे नऊपैकी सात सदस्य निवडून आले होते आणि अडीच वर्षासाठी सरपंच म्हणून श्री रमेश राठोड यांची निवड करण्यात आली होती परंतु अडीच वर्षानंतर सरपंच श्री रमेश राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आज पुन्हा सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यात नंदा गाउत्रे आणि अनुप वसाके यांच्या विरोधात माजी सरपंच श्री रमेश राठोड यांनी पुन्हा सरपंच पदासाठी निवडूक रिंगणात उतरून आपले दंड थोपटले परंतु अर्ज छानणीच्या वेळी श्री रमेश राठोड यांच्या अर्जात त्रुटी आढल्यामुळे त्यांच्या अर्ज खारीज करून त्यांना सरपंच पदाच्या निवडणुकीतून बाद करण्यात आले . त्यामुळे ग्रामविकास आघाडीकडून सौ.नंदा गाउत्रे आणि मानकर गटाकडून अनुप वसाके हे निवडणूक रिंगणात स्थिर राहिले या निवडीसाठी सर्वानुमते गुप्त मतदान घेण्याचे ठरले त्यावेळी एकूण नऊ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला परंतु दोन्ही उमेदवाराला चार -चार मते मिळाली आणि एक मत नोटा या चिन्हावर मिळाल्याने शेवटी ईश्वर चिट्ठी काढून निकाल जाहीर करण्यात आला त्यात सौ. नंदा गाउत्रे हिच्या नावाची चिट्ठी निघाल्याने तिला विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून निवडणूक अधिकारी म्हणून साखरा येथील मंडळ अधिकारी श्री शिंदे साहेब, तलाठी श्री मानकर साहेब आणि ग्रामसेवक श्री भगत साहेब यांनी काम पाहिले. निवडणूक झाल्यानंतर सरपंच म्हणून निवडून आलेल्या नंदाताई ग्यानीदास गाउत्रे सोबत सर्व सदस्यांच्या गळ्यात हार घालून, पेढाचा घास भरवत,गुलालांची उधळण करत, फटाक्यांची अतिशबाजीने सहकाऱ्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©