यवतमाळ सामाजिक

मुख्याध्यापकाने केला स. शिक्षकांचा सत्कार

मुख्याध्यापकाने केला स. शिक्षकांचा सत्कार

सहायक शिक्षकांच्या पाठीवर प्रेमाने कौतुकाची थाप देत, मुख्याध्यापकांनी केला शिक्षकांचा सत्कार. दिनांक ५सप्टेंबर ला शिक्षक दिनाचे औचित्य साधून, जिल्हा परिषद हायस्कुल लोणबेहळ च्या; अष्टपैलू मुख्याध्यापिका आ.कल्पनाताई उघडे यांनी आपल्या शाळेतील व प्रा.म.शाळेतील सर्व शिक्षकांचा शॉल-श्रीफल व आम्र वृक्ष देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करत यथोचित सत्कार केला. त्या क्षणी च्या सत्काराने सर्व शिक्षक भाराऊन गेले होते .ओठातील शब्द डोळ्यातुन उतरले होते. एवढा तो भावनिक प्रसंग होता.

त्यावेळी शा .व्य. स.श अध्यक्ष प्रमोद टाले, रोहिदास राठोड़,सौं एकता राठोड़ , सुनिता चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्र संचलन सौ उघडे यांनी, तर आभार श्रीमती महल्ले यांनी मानले.सर्व विद्यार्थी ना राजगीरा लाडू वाटण्यात आले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©