यवतमाळ सामाजिक

यवतमाळ का राजा चे 61 व्या वर्षात पदार्पण उद्या भव्य शोभा यात्रेद्वारा श्री ची स्थापना

यवतमाळ का राजा चे 61 व्या वर्षात पदार्पण उद्या भव्य शोभा यात्रेद्वारा श्री ची स्थापना

मागील 61 वर्षापासून यवतमाळकरांन मध्ये लोकप्रिय नवयुवक गणेश मंडळ मारवाडी चौक यवतमाळ यवतमाळ का राजा सेवा परिवार च्या वतीने श्री च्या स्थापने साठी सात सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता तलाव फैल येथील वनकर बंधू येथून श्री ची भव्य स्थापना मिरवणूक शोभायात्रा काढण्यात येणार असून नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा यवतमाळकरांचे लक्ष वेधणारी ही शोभायात्रा राहणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या वर्षानिमित्त शौर्य पथक . शेगाव येथील सुप्रसिद्ध गजानन वारकरी भजन मंडळ 25 मुखी महाकाली माता राजस्थान येथील नृत्य करणारे उंट.. जसलमेर येथील राजस्थानी परंपरागत नृत्य लखनऊ येथील श्रीराम चलचित्र व वानरसेना यवतमाळ का राजाची 40 धर्म ध्वजा घेऊन महिला मंडळ तसेच आकर्षक बँड पथक हे शोभायात्रेचे विशेष आकर्षण असून ही शोभायात्रा जुनी मेन लाईन तहसील चौक नेताजी चौक बस स्टेशन चौक दत्त चौक जादू चौक शनी मंदिर चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत नयनरम्य सुवर्ण जहाज मंडप श्री च्या दरबारात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होईल

या वर्षापासून विशेष आकर्षण शयन आरती नियमितपणे सकाळी साडेपाच व रात्री 11:41 शय्या आरती व नियमितपणे सकाळ संध्याकाळ श्रींची आरती 10 सप्टेंबर रोजी सुंदर कांड चे आयोजन 15 सप्टेंबर रोजी हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये अथर्वशीर्ष चे आयोजन व सायंकाळी चार वाजता वस्त्रदान कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे नियमितपणे गरजू रुग्णांसाठी आरोग्यसेवा अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन यवतमाळ का राजा सेवा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे तसेच सकाळ व संध्याकाळी नियमितपणे महाप्रसादाचे आयोजन यवतमाळ का राजा सेवा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे या स्वर्णसंधीचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान नवयुवक गणेश मंडळाचे व यवतमाळ का राजा सेवा परिवाराचे अध्यक्ष मनोज पसारी यांनी केले आहे

Copyright ©