यवतमाळ सामाजिक

सुनिल ईश्वर यांना अमरावती विद्यापीठा तर्फे वाणिज्य शाखेतील आचार्य पदवी बहाल

सुनिल ईश्वर यांना अमरावती विद्यापीठा तर्फे वाणिज्य शाखेतील आचार्य पदवी बहाल

भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय, बाभुळगाव येथिल वाणिज्य शाखेतील प्रा. सुनिल नामदेवराव ईश्वर यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने नुकतीच “गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे व उत्पादन विषयक समस्यांचे विश्लेषणात्मक अध्ययन (कालखंड 2010-11 ते 2020-21)” ह्या विषयात आचार्य पदवी बहाल केली आहे. त्यांना शिवरामजी मोघे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पांढरकवडा येथिल वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. राधेश्यामजी चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. वाणिज्य शाखेतील अतिशय महत्वाच्या विषयात संशोधन पूर्णत्वास नेल्याबद्दल त्यांचेवर चहूबाजूने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ते आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, सुविद्य पत्नी, शिवशक्ती शिक्षण संस्था कोठा (वेणी) चे व्यवस्थापक प्रा. बाळासाहेब धांदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत बारडकर, सहकारी प्राध्यापक व मित्रपरिवार ह्यांना देतात.

Copyright ©