यवतमाळ सामाजिक

भारती महाविद्यालय येथे राखी बनाओ स्पर्धा आणि राखी विक्री प्रसन्न 

भारती महाविद्यालय येथे राखी बनाओ स्पर्धा आणि राखी विक्री प्रसन्न 

स्व. राजकमलजी भारती कला, वाणिज्य व श्रीमती सुशिलाबाई रा.भारती विज्ञान महाविद्यालय, आर्णी, जिल्हा- यवतमाळ येथे रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून राखी बनाओ स्पर्धा संपन्न झाली. विद्यार्थिनींनी सुंदर व आकर्षक अशा राख्या बनवून आणल्या. यामध्ये विद्यार्थिनींनी विविध रंगाचे कुंदन, टिकली, रेशीम, वेगवेगळ्या डोरी, स्पंज, लोकर ,पराग, मोती इत्यादी साहित्याचा उपयोग करून विद्यार्थिनींनी आपल्या कल्पनाशक्तीचा आणि तर्कशक्तीचा वापर करून राख्या बनविल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. एन. ए. पिस्तुलकर सर उपस्थित होते. तर परीक्षक म्हणून प्रा. डॉ .रूपाली टेकाडे आणि प्रा. अस्मिता वानखेडे उपस्थित होत्या. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्राचार्य एन. ए. पिस्तुलकर सर यांनी आपल्या वक्तव्यामध्ये स्वयंरोजगारामुळे व्यक्तीला नवीन कल्पना आणि नवउपक्रमाची अंमलबजावणी करण्याची संधी मिळते. ज्यामुळे समाजात नवीन आणि चांगले उत्पादन व सेवा मिळतात अशाप्रकारचे मार्गदर्शन सरांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉ. एस .व्ही. वानखेडे सर यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करू विद्यार्थिनींना स्वयंरोजगाराकरिता प्रेरित केले .तर परीक्षक रूपाली टेकाडे यांनी स्वयंरोजगार केवळ व्यक्तिगत प्रगतीच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. स्वयंरोजगारामुळे व्यक्तीला समाजात एक वेगळी ओळख मिळते ज्यामुळे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढते. अशा प्रकारचे मार्गदर्शन मॅडमनी विद्यार्थिनींना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. मनीषा क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैशाली गजानन पोटे बी.ए. भाग एक हिने केले तर आभार प्रदर्शन कु. उज्वला देवानंद बोरचाते बीए भाग एक हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. मडावी, प्रा. मनवर, प्रा.कुसरे , प्रा. ढाकुलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला जवळपास सर्वच विद्यार्थिनींचा सहभाग होता.

Copyright ©