यवतमाळ शैक्षणिक

सुसंस्कार विद्या मंदिर येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा

सुसंस्कार विद्या मंदिर येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा

सुसंस्कार विद्या मंदिर या शाळेत ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन यवतमाळचे प्रसिध्द डॉक्टर नंदकिशोर गुप्ते आणि प्रमुख पाहुणे म्हणुन प्रसिद्ध दंतचिकित्सीका डॉ.ज्योती गुप्ते म्हणून तसेच शाळेचे उपाध्यक्ष सुनिल गुगलीया लाभले, त्याच बरोबर संस्थेचे सचिव श्री. संजय कोचे,संचालक गणेश गुप्ता, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे, तसेच शिवनेरी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सचिव श्री.रामचंद्र हांडे, सौ.सुशिला नाईक,पालक – शिक्षक संघाचे सन्मानणीय सदस्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वप्रथम अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले व राष्ट्रगीताने ध्वजवंदना देण्यात आली.

विद्यार्थी दशेतच राष्ट्रभक्तीची भावना,स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे थोर पुरुष आणि क्रांतिकारकांचे धडे त्याबरोबरच देशाप्रती राष्ट्रभक्तीची निष्ठा व भावना अधिक वृद्धिंगत व्हावी याकरिता शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये देशभक्तीपर गीते, नृत्ये व भाषणाचा समावेश होता,प्राथमिक आणि माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व नृत्ये यांच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.इयत्ता ९वी व १० वी च्या विद्यार्थ्यांनी ये वतन वतन आबाद रहे तु ……या गाण्यावर संगीतमय वादन करून उपस्थितांची मन जिंकली.

डॉ. नंदकिशोर गुप्ते यांनी अध्यक्षीय भाषणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचे महत्व पटवून दिले व त्याबरोबरच वर्तमान जीवनात यश प्राप्त करण्यासाठी पारंपरिक क्षेत्रामागे न लागता,चांगले व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी कशापद्धतीने स्वतःला गुणवान सिद्ध करावे याचा मूलमंत्र दिला.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता १० वीच्या वेदश्री देशमुख व गनिष्का जांगीड यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका राखी नहाते ह्यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ या गीताने झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Copyright ©