Breaking News यवतमाळ

वाकान येथून अवैध रती तस्करी महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

ता . प्र . निलेश नरवाडे

वाकान येथून अवैध रती तस्करी महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

महागांव तालुक्यातील शेवटच्या टोकावर व डोंगराळ भागात वसलेल्या मौजा वाकान येथील दुधगाळ नाल्यामधुन अवैध पध्दतीने रेतीची तस्करी सर्रास सुरू असुन रात्री बेरात्री फार मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जात आहे याकडे महसूल कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने या रेती उपसा करून तस्करी करणाऱ्या चोरट्यांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढले आहे आजुबाजुच्या परिसरातील हा एकमेव दुधगाळ नाला आहे व या नाल्यामधुन दर वर्षी हजारो ब्रास रेती तस्करी करून अव्याच्या सव्या भावाने जवळपासच्या गावांमध्ये विक्री केल्या जात त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा चुराडा होत असुन याकडे महसूल कर्मचारी पाठ फिरवत असल्याने सदर रेती चोरट्यांना चालना मिळत असुन याकडे विंध्य जिल्हा अधिकारी साहेब यवतमाळ यांनी तातडीने लक्ष वेधन्याची आवश्यकता असुन या रेती चोरट्यांवर कार्यवाही करुन त्यांच्या मुसक्या आवळने गरजेचे आहे अन्यथा शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्या शिवाय राहणार नाही अशी चर्चा जोर धरत असुन या रेती तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे असे नागरिकांमधून बोलल्या जात आहे

Copyright ©