यवतमाळ सामाजिक

‘त्या’ सेतूची स्वतंत्र चौकशी करा

‘त्या’ सेतूची स्वतंत्र चौकशी करा

लाडकी बहिण योजनेचे अशासकीय सदस्य अभिषेक पांडे यांची मागणी.

कळंब. शासकीय योजनेसाठी लागणारे बनावट कागदपत्र बनवून अनेकांना गंडा घालणाऱ्या त्या श्री. साई कॉम्पुटर अँड आधार केंद्राची चौकशी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी स्वतंत्र समिती नेमून करण्याची मागणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अशासकीय सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख अभिषेक पांडे यांनी केली आहे.

शहरातील श्री. साई कॉम्पुटर सेतू केंद्रातून अनेक बनावट दाखले बनवल्या गेले.लाडकी बहीण योजनेतुन महिलांकडून बक्कळ पैसे उकळल्या गेले. कळंब नगर पंचायत च्या एका नगरसेवकासह तलाठ्याचेही बनावट शिक्के वापरून त्याने बांधकाम पेट्या चे अर्ज बनवून दिले.त्या पेट्या मिळण्यासाठी अनेकांच्या आधार कार्डावरील पत्ते बदलत 2300 रुपये घेऊन घरपोच पेट्याही त्याने वाटल्या.दोन दिवसांआधीच कोठ्याचे शेतकरी अनिकेत जळीत यांनी ‘त्या ‘ भामट्या सेतूचालकाविरोधात बनावट पिकविम्याची पोलिसांत तक्रार केली.दरम्यान यां बनावट प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रुजली आहे. श्री.साई कॉम्पुटर व आधार केंद्राच्या या प्रकरनातं महसूल चे मोठंमोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व तहसीलदार धिरज स्थूल यांनी स्वतंत्र चौकशी समिती नेमून यां सेतू केंद्राची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व यवतमाळ चे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कडे आपण यां सेतूच्या चौकशी संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी दैनिक लोकसूत्र शी बोलताना सांगितले.

कळंब येथून नुकतीच बदली झालेल्या व कळंब महसूल कार्यालयात ‘वेटे’ज असलेल्या त्या अधिकाऱ्यानेही स्वतःच्या नातेवाईकांचे कागदपत्र काढताना बऱ्याच अनागोंदी केल्या आहे.त्या अधिकाऱ्याचा ही ऐन बदलीच्या वेळेवर पोळा फुटण्याची दाट शक्यता वाढली असून जिल्हाधिकांऱ्याकडे पुराव्यासह तक्रार होण्याच्या प्रक्रियेला सामाजिक क्षेत्रातुन वेग आला आहे.

Copyright ©