यवतमाळ सामाजिक

कृष्णा पुसनाके यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

कृष्णा पुसनाके यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

शालेय साहित्य,वृक्षारोपण,करियर विषयक मार्गदर्शन,सर्प विषयक जनजागृती करत वाढदिवस साजरा

संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी,कृषी ज्ञानदा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था,बिरसा ब्रिगेड,व एम.एच.२९ हेल्पिंग हॅन्ड वन्यजीव संघटना यवतमाळ च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सावरगड,ता.जिल्हा यवतमाळ येथे दिनांक १३ जुलै रोजी सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष,कृष्णा पुसनाके यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील गरजु,अल्पभूधारक,शेतमजूर कुटुंबातील एकूण ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.विकास झाडे सर यांना वृक्ष लागवडीसाठी एकूण ५० झाडे सुपूर्द करण्यात आली.नंतर जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय,यवतमाळ येथे ईयत्ता ८ वी ते १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना शालेय साहित्य वाटप करून १२ वी नंतर असलेल्या करियरच्या संधी या विषयावर प्रा.पंढरी पाठे यांनी कन्या विद्यालयाचे प्राचार्य श्री.तांड्रावार सरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मार्गदर्शन केले.तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना प्रज्वल तुरकाने व मोंटू तेलगोटे यांनी विदर्भातील विषारी सापांबद्दल माहिती दिली.आज १४ जुलै रोजी यवतमाळ शहरातील स्थानिक गोधनी रोड परिसरातील(स्नेक पॉईंट)या प्रक्षेत्रामध्ये औषधी वनस्पतींची लागवड करून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले.सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रज्वल तुरकाने,मोंटू तेलगोटे,विकास राठोड,सचिन मनवर,निलेश मेश्राम,प्रकाश कांबळे,जीत पाटील,यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©