महाराष्ट्र सामाजिक

आझाद नारी फाउंडेशन यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम काल अंबरनाथ पश्चिम येथील आम्रपाली बुद्धविहार येथे संपन्न

आझाद नारी फाउंडेशन यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम काल अंबरनाथ पश्चिम येथील आम्रपाली बुद्धविहार येथे संपन्न

दि.२६ रोजी आझाद नारी फाउंडेशन यांच्या वतीने अंबरनाथ (प) येथील आम्रपाली बुद्ध विहार येथे स्थलांतरित कामगारांच्या व एकल पाल्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी मा.न्या.प्रभाकर चिवटे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शालेय साहित्य देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी त्यांनी सांगितले कीं, विद्यार्थ्यांना ध्येय गाठायचे असेल तर प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास केल्यास नक्कीच यश गाठता येते आज आपला सन्मान त्याचे द्योतक आहे. विद्यार्थ्यांनी बौद्धिक प्राप्ती साधण्यासाठी प्रचंड वाचन केले पाहिजे आझाद नारी फाउंडेशन च्या अशा स्तुत्य कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना देखील प्रेरणा मिळते आपातकालीन संकट असो अथवा सामाजिक शैक्षणिक कार्य असो आझाद नारीची संपूर्ण टीम हे स्वतःला झोकुन देवून काम करते त्यामुळे सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून, विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाच्या माध्यमातून कौतुकाची थाप पडते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळते त्यामुळे हा स्तुत्य उपक्रम आहे असे कौतुक देखील त्यांनी याप्रसंगी केले.!

कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शाहु महाराज व महात्मा फुले सावित्रीमाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संस्थेचे संचालक मा.राहुल सुरवाडे यांनी संस्थेच्या कार्याचा लेखा जोखा मांडला ते म्हणाले की आझाद नारी फाउंडेशन ही गोरगरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, विद्यार्थ्यांना खरोखरचं गरज असते अशा विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून आम्ही वह्या, पुस्तके, बॅग, शालेय गणवेश असे शालेय साहित्य अशी छोटीशी भेट म्हणून त्यांना देत असतो शिवाय ज्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव दर वर्षी संस्थेच्या वतीने केला जातो व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी म्हणून गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करतो विद्यार्थी हेच देशाचे भविष्य आहे त्यामुळे त्यांचा सन्मान करणे आम्हीं आमचे कर्तव्य समजतो.

सदरील कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य महाराष्ट्र बँकेच्या अधिकारी कर्मचारी कल्याणी वाघ मॅडम तसेच प्रियंका लोणकर मॅडम यांनी मदत केली.

यावेळीं प्रमुख उपस्थिती म्हणून मा.ऍड. प्रेमलता सोनवणे, ऍड.मुमताज शहा, ऍड. योगेश वासनिक, ऍड. स्मिता देशमुख, मा.विवेक मेश्राम, मा.अक्षय तपकीर, मा.सौरभ भीमटे, मा.स्वप्नील एकलारे, मा.समाधान सुर्वे, भिमराव दळवी, आकाश पाटील, सुंदर हाते, जिवन सोमस्कर, गजानन भगत, साहेबराव निंबाळकर, आनंद सपकाळ, व मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.स्नेहा भोईते यांनी केले तर आभार ऍड. योगेश वासनिक यांनी मानले.

Copyright ©