नागपूर सामाजिक

बेला गावात स्वच्छता मोहिमेचा उडाला फज्जा

———————————————
गावात घाणीचे साम्राज्य
———————————————
उमरेड- तालुक्यातील सर्वश्रृत असलेली बेला ग्राम पंचायत सध्या अस्वच्छतेने बरबरटली असून गावात जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने स्वच्छतेचा फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शासन स्तरावरून नानाविध प्रकारचे उपाययोजना आखून स्वच्छते कडे जास्त भर दिल्या जात असून स्वच्छतेचा एक भाग म्हणून गावाला पारितोषिक बहाल केल्या जाते. मात्र या बाबीला बेला ग्राम पंचायत पुर्णतः अपवाद ठरली आहे. येथिल वॉर्ड क्रमांक एक मधील स्वच्छतातर सोडाच मात्र रहिवाश्यांनी जमा केलेला कचरा फेकायचा कुठे ही समस्या उभी राहिली आहे. येथिल स्वच्छता मोहीम यंत्रणा मुंग गिळून गाढ झोपेत असल्याचे दिसून येत आहे. या गावातील रस्त्याच्या कडेला सडलेला भाजीपाला घाण कचरा टाकल्या जात असल्याने त्याची दुर्गंधी एवढी पसरली आहे की त्यामुळे गावकऱ्यांच्या प्रकृतीवर काय परिणाम करेल याचा विचार करणे सुध्दा उचित नाही. पावसाळा सुरू झाला असल्याने प्रथमतःच साथरोगाने व कोरोणा महामारीच्या भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या जनतेत मानव निर्मित भीती येथिल यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे निर्माण झाली आहे. घरात राहणे तर सोडाच मात्र या गावांतील रस्त्याने मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेवून करावे लागत आहे. येथिल घाण कचरा व्यवस्थापन मोडकळीस आल्याने नागरिक सरळ आपल्या घरातील कचरा सरहास रस्त्यावर फेकत आहे. याला अडकाव करून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या ठिकाणी स्थानिक स्वराज्यची कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने गाव स्वच्छतेसाठी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न गावकऱ्यामध्ये निर्माण झाला आहे. वॉर्ड क्रमांक एक मध्ये स्वच्छते विषयी कोणत्याही सुविधा नसल्याने येथिल जनतेला अनेक समस्याशी सामना करावा लागत आहे. हे सर्व कार्य बेला ग्राम पंचायतिचे असताना सुध्दा ते याबाबिकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून नागरिकाच्या आरोग्याचा विचार न करता त्यांच्या जीवाशी खेळत आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब व सबंधित अधिकाऱ्यांनी येथिल गंभीर प्रकाराकडे लक्ष देवून जनतेच्या आरोग्य हितासाठी स्वच्छता राबवून गावातील रोगराई घालवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Copyright ©