यवतमाळ शैक्षणिक

आदर्श इंग्लिश मिडियम स्कुल यवतमाळ दहावी परिक्षेत उत्कुष्ट निकाल

आदर्श इंग्लिश मिडियम स्‍कुल  यवतमाळ दहावी परिक्षेत उत्कुष्ट निकाल

यवतमाळ :- दि.२७/०५/२०२४रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे यांनी केलेले सत्र २०२३-२४ चे निकाल यामध्ये स्थानिक असलेले आदर्श इंग्लिश मिडियम स्‍कुल भोसा रोड, यवतमाळ यांचे दहावी परिक्षेत उत्कुष्ट निकाल लागलेल आहे शाळेचा निकाल १००% लागले असून फेब्रुवारी –मार्च २०२४ परीक्षा मध्ये विद्यार्थांनी यश संपदान केले शाळेची आपली १००% ‍निकालाची परंपरा कायम ठेवली व सदर विद्यार्थ्यांचे शिक्षकवृंद कडून अभिनंदन करण्यात येत आहे

सर्वच्‍या सर्व विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले असून यावर्षी शाळेच्‍या गुणवत्‍ता यादीत येण्‍याच्‍या मान प्रथम केवल गिरीधर चुटे (८७.४०%) या विद्यार्थ्‍याने मिळवला. आपले नाव व शाळेचे नाव अमरावती विभागीय शिक्षण मंडळ अमरावती येथे कायम कोरले. तसेच शाळेमधुन मनिष उकंडा घोटेकर या विद्यार्थ्‍याने (८६.६०%) गुण घेत दुसरा येण्‍याचा मान प्राप्‍त केला. व अनिमेश जितेंन्‍द्र मेश्राम या विद्यार्थ्‍याला (८६.२०%) गुण मिळवत तिसरा येण्‍याचा मान प्राप्‍त केला तसेच चौथा क्रमांक सिध्‍देश किरण इंगोले (८३.६०%) व पाचवा क्रमांक आदित्‍य यशवंत पराते (७६.२०%) गुण घेत सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्‍तीर्ण झाले.

या उत्कुष्ट निकाला करीता संस्थेचे अध्यक्ष मा.सैय्यद वसीम सैय्यद लतीफ सर यांनी सर्व ‍विद्यार्थ्यांचे व ‍शिक्षकांचे अभिनंदन केले व मुख्याध्यापिका सिमा बनकर तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्‍तर कर्मचाऱ्यांतर्फे विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील ‍ भविष्या करीता शुभेच्छा देण्यात आली.

Copyright ©