यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

*क्रीडा विभागातर्फे खेल प्रोत्साहन पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रित* *खावटी अनुदान योजनेसाठी 10 जून पर्यंत अर्ज सादर करावा*

 

यवतमाळ, दि. 27 :

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सन 2021 करिता जीवन गौरव पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जून पुरस्कार, खेल प्रोत्साहन पुरस्कारासाठी खेळाडुंकडून नामनिर्देशनाचा प्रस्ताव मागविण्यात येत आहे. सदर प्रस्ताव 27 जून 2021 पर्यंत केंद्र शासनास सादर करणे आवश्यक आहे. तसेच विहीत कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. 10 जून 2021 पर्यंत क्रीडा व युवक सेवा संचालनालयास खास दुतामार्फत सदर प्रस्ताव सादर करण्यात यावे.

अर्जदारांनी विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची, व्यक्तींची शिफारस न घेता थेट केंद्र शासनास surendra.yadab@nic.in किंवा girnish.kumar@nic.in या इमेलवर सादर करावे.

अर्जून पुरस्कार :- आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा क्षेत्रात क्रीडापटूंच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी अर्जून पुरस्कार देण्यात येतो. 2021 मधील पुरस्कारासाठी पात्र होण्याकरिता एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागील 4 वर्ष सातत्याने चांगली कामगीरी करून नेतृत्व, क्रीडा कौशल्य, शिस्तीची भावनासुध्दा दर्शविली पाहिजे.

ध्यानचंद पुरस्कारासाठी पात्र होण्याकरिता एखाद्या खेळाडूंने आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केलेली असावी. क्रीडापडू म्हणून वैयक्तिक क्षमतेत खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी योगदान आवश्यक आहे. तसेच खेळाडूने नेतृत्व, क्रीडा कौशल्य, शिस्तीची भावनासुध्दा दर्शविली पाहिजे.

द्रोणाचार्य पुरस्कार :- उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कारासाठी प्रशिक्षक म्हणून पूर्ण वेळ काम केले असेल किंवा अर्धवेळ प्रशिक्षक म्हणून काम केले असेल तर त्या खेळाडूने उर्वरित वर्षाच्या तत्पुर्वी 4 वर्ष उत्कृष्ट कामगिरी केले असावी. त्यानुसार 1 जानेवारी 2017 ते 1 डिसेंबर 2020 या कालावधीतील यशाचा विचार केला जाईल. आजीवन योगदानासाठी देण्यात आलेल्या दोन पुरस्कारासाठी 20 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीत उत्कृष्ट खेळाडू तयार करण्यात आलेल्या कर्तृत्वाचा विचार केला जाईल.

खेल प्रोत्याहन पुरस्कार नवोदित तरूण प्रतिभा ओळखने व त्यांचे पालन – पोषण करणे, कार्पोरेट सामाजिक उत्तर दायित्वाद्वारे खेळांना प्रोत्साहन करणे, क्रीडा व्यक्ती आणि क्रीडा कल्याण अंमलबजावणी करणे, क्रीडा विकासाकरीता राष्ट्रीय खेळ उत्सव पुरस्कार या चार पुरस्काराकरीता सोबत दिलेल्या संकेत स्थळावर पुरस्काराबाबत नियमावली उपलब्ध आहे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

___________________________________________

खावटी अनुदान योजनेसाठी 10 जून पर्यंत अर्ज सादर करावा

यवतमाळ, दि. 27 मे :

आदिवासी विकास विभागामार्फत सन 2020-21 या वर्षाकरीता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना आधार देणेकरीता खावटी अनुदान योजना एक वर्षाकरीता राज्य शासनाने सुरु केलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यानी 10 जून पर्यंत अर्ज सादर करावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत मनरेगा योजनेत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत कमीत कमी एक दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काम केलेले आदिवासी मजूर, आदिम व पारधी जमातीची सर्व कुटूंबे जिल्हाधिकारी यांचे सल्याने प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटूंबे, त्यामध्ये परितक्ता, घटस्फोटीत महिला, विधवा महिला, भूमिहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेले कुटूंब, वैयक्तिक वनहक्क धारक कुटूंबे यांना खावटी अनुदान योजनेचा लाभ देण्यात येतो.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद या कार्यालयाअंतर्गत पुसद, दारव्हा, दिग्रस, महागांव, उमरखेड, नेर, आर्णी असे एकूण 7 तालुके येत असून या तालुक्यातील ग्रामस्तरीय तसेच शहरस्तरीय भागातील समित्यांमार्फत खावटी अनुदान समन्वयाकडून खावटी अनुदान योजनेचे अर्ज भरण्यात आलेले आहे. परंतू काही आदिवासी लाभार्थ्यांचे अर्ज यापूर्वी भरण्यात आलेले नसल्यास अशा पात्र लाभार्थ्यांनी आपले आवश्यक कागदपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह (आधारकार्ड, जातीचा दाखला, रेशनकार्ड, राष्ट्रीय बँकेचे पासबूक, विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र. भूमिहीन असल्यास भूमिहीन प्रमाणपत्र, मनरेगा लाभार्थी असल्यास या योजनेवर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत काम केल्याचा पुरावा) त्यांचे गावापासून जवळ असलेल्या मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा किंवा अनुदानित आश्रमशाळा तसेच गृहपाल, आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतीगृह या ठिकाणी जाऊन पात्र लाभार्थ्यांनी 10 जून 2021 पर्यंत परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज भरावे. यापूर्वी सदर योजनेकरीता ज्या लाभार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच सदर बाबत काही अडचणी असल्यास दूरध्वनी क्रमांक 07233-249546 वर संपर्क करावा, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी कळविले आहे.

Copyright ©