Breaking News यवतमाळ शैक्षणिक

*युसीमॉस अबेकस द्वारा 23 व 24 एप्रिल रोजी ऑनलाईन राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन संपन्न*

 

यवतमाळ –
यवतमाळ येथील युसीमॉस अबेकस अवधुतवाडी यवतमाळच्या संचालिका सौ. रचना आशिष कलंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 23 व 24 एप्रिल रोजी युसीमॉस अबेकसच्या राज्यस्तरीय दहावी ऑनलाईन स्पर्धे मध्ये अवधुतवाडी यवतमाळच्या 29 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उज्वल यश संपादन केले. या स्पर्धे मध्ये राज्यस्तरावर सेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये 200 प्रश्‍नांचे उत्तर दहा मिनटांमध्ये देणे आवश्यक होते. या स्पर्धेत युसीमॉस अबेकसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून भाग्यश्री गजानन वानखडे ने चॅम्पियन ऑॅङ्ग चैम्पियनची ट्रॉङ्गी व 5000 रुपये रोख पुरस्कार व गिफ्ट आर्टीकल प्राप्त केले व युसीमॉस अबेकस अवधुतवाडी यवतमाळ शाखेचे नांव उज्वल केले.
चॅम्पियन ट्रॉङ्गी वैष्णवी धानोरकर व स्नेहल वानखडे यांनी प्राप्त केली. तर प्रथम क्रमांकावर रिया तरोने, ईशान मिश्रा, आरुष बंग तर द्वितीय क्रमांकावर जानवी बारेकर, प्रणाली येनप्रिडीवार, शिवांशू जाजू तर तृतीय क्रमांकावर योगेश ठाकरे, विराज लाखानी, अवनी राठोड तर चौथ्या क्रमांकावर पिंटू ठोकल, झील कोटक, आदित्य दुधे, अंश जाधव, योगिता ठाकरे, जमिला बॉम्बेवाला, रिद्म कनकुलवार, ग्याता राहेजा, तन्मय अग्रवाल यांनी गुणवंत ट्रॉङ्गी पटकाविली तसेच वेदांत जयस्वाल, अभिनव त्रिवेदी, अर्थव तायवाडे, अरनव लाडखेडकर, अनुज खोडे यांनी पारटिसिपेशन ट्रॉङ्गी प्राप्त केली. काव्या सोनी कलंत्री, तन्मय अग्रवाल, वेदांत जयस्वाल, वैष्णवी धानोरकर, अनरव त्रिवेदी यांनी पदविची परिक्षा पुर्ण केल्याबद्दल त्यांना गौरवान्वित करण्यात आले. कोरोना संसर्ग महामारी दरम्यान शिक्षण क्षेत्र डबघाईस आले असतांना शाळा व क्लासेस ऑनलाईन शिक्षण प्रणालीवर शिक्षण देत असतांना राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेत युसीमॉस अबेकसच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल संचालिका रचना आशिष कलंत्री व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Copyright ©