Breaking News महाराष्ट्र राजकीय सामाजिक

गृहमंत्र्याची दखल* —

*गृहमंत्र्यांनी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र*
——————————————-
*पत्रकारशक्ती प्रतिनिधीने केली होती मागणी*
****************************
मुंबई (जिल्हा प्रतिनिधी) कोरोना या महामारीच्या आजारात शासन स्तरावरून देशातील काही राज्यातील पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्यात आल्याचे समजले आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील विविध घटकांतील पत्रकारांचा सुध्दा समावेश करण्यात यावा असे निवेदने महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांनी सादर केलीत यात पत्रकार शक्तीचे मुंबई जिल्हा प्रतिनिधी दिनेश भोजने यांनी सुध्दा निवेदन सादर केले या बाबीची सकारात्मक दखल घेत राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून गृह विभागाकडून पाठविले आहे.
कोरोना काळात सर्वच घटकातील उद्योगाला सरकार थोडीफार मदत करीत असून या काळात देशाचा चौथा खांब म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातील पत्रकार बांधव दुर्लक्षित झाला आहे. या काळात अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे. इतर व्यवसायासोबत पत्रकारांचे सुध्दा उदरपोषण कठीण झाले आहे. यातच देशात काही राज्यात पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर मध्ये समावेश केल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांनी राज्य सरकारकडे अनेक निवेदने सादर केलीत यामध्ये पत्रकारशक्तीचे मुंबई जिल्हा प्रतिनिधी दिनेश भोजने यांनी सुध्दा निवेदन सादर केले आहे. या बाबीची दखल घेत राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत राज्याचे मुख्यमंत्री यांचे कडे गृह विभागाकडून पत्र पाठवून राज्यातील पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर मध्ये समावेश करण्याबत विचारात घेऊन तसे निर्णय घ्यावेत असे गृह विभागाकडून कळविले आहे.
यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील पत्रकार बांधवांचे लक्ष लागले आहे. पत्रकार शक्तीचे मुंबई जिल्हा प्रतिनिधी दिनेश भोजने यांनी निवेदन देते वेळी त्यांना आपल्या पत्रावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. यावरून ना. दिलीप वळसे पाटील यांचे आभार मानले जात असून महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांच्या थोड्या फार आश्या पल्लवित झाल्या आहेत.

Copyright ©