यवतमाळ सामाजिक

अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद यवतमाळ तर्फे जागतिक ग्राहक दिवस साजरा

अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद यवतमाळ तर्फे जागतिक ग्राहक दिवस साजरा

अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद यवतमाळ तर्फे जागतिक ग्राहक दिवस साजरा करण्यात आला.

जागतिक ग्राहक दिवसा निमित्त छोटेखानी कार्यक्रम घेऊन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ग्राहकांची फसवणूक, ग्राहकांचे अधिकार,ग्राहकांसाठी शासनाने तयार केलेली नियमावली आणि ग्राहकांच्या खरेदी,विक्री करण्यात येणाऱ्या व्यवहार संबंधी मार्गदर्शन करण्यात आले..

ह्या वेळी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद चे पदाधिकारी विदर्भ प्रदेश अध्यक्षा ऍड. अरुणा राठोड, जिल्हाध्यक्ष नासिर शेख,जिल्हाध्यक्षा वणमाला अवथळे, जिल्हा कार्याध्यक्षा संगीता घोडमारे, जिल्हा सचिव प्रेमा पात्रिवार,जिल्हा उपाध्यक्षा रेखा रणदिवे,मनीषा आकरे,तालुका अध्यक्षा छबुताई आठवले, जिल्हा सहसचिव संगीता फुलमाळी, तालुका सचिव शाइस्ता खान, दारव्हा तालुका अध्यक्षा मनीषा जाधव, दारव्हा तालुका सचिव मनीषा बोकडे आदि उपस्थित होते..

Copyright ©